Car Full Forms : जर तुम्ही कारप्रेमी असाल आणि तुम्हाला चारचाकी वाहनांबद्दल थोडीशी जरी माहिती असेल तर तुम्ही अनेकदा SUV, MUV, XUV, TUV सारख्या चारचाकी वाहनांच्या सेगमेंटबद्दल ऐकले असेल. पण तुम्हाला या सर्व वाहनांचा फुल फॉर्म नेमका काय? तसेच, या वाहनांमध्ये नेमका कोणता फरक आहे याची माहिती आहे का? जर तुम्हाला या वाहनांचा फुल फॉर्म माहित नसेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला यांचे फुल फॉर्म सांगणार आहोत. 

  


SUV चा फुल फॉर्म काय? 


SUV चा फुल फॉर्म Sport Utility Vehicles आहे. SUV हे नाव यासाठी कारण या कारचा खास स्पोर्टी लूक लक्षात घेऊन कारची डिझाइन केलेली आहे. या वाहनाची खास गोष्ट म्हणजे ही कार खडबडीत रस्त्यावर देखील चालवण्यास उत्तम आहे. या कारला फॅमिली कार असेही म्हणतात कारण त्यात भरपूर स्पेस आहे. या वाहनांमध्ये चांगले ग्राउंड क्लिअरन्स आणि पॉवर आहे.


MUV चा फुल फॉर्म काय?


MUV चा फुल फॉर्म मल्टी युटिलिटी व्हेईकल (Multi Utility Vehicle) असा आहे. अनेक उपयोग लक्षात घेऊन कारची रचना करण्यात आली आहे. याचे नाव मल्टी युटिलिटी व्हेइकल आहे याचा अर्थ तुम्ही ही कार अधिक सामान, वजन आणि जास्त माणसांची क्षमता या कारमध्ये मावू शकते. MUV कारच्या ऑन रोड परफॉर्मन्सबद्दल बोलायचे तर ते खूप चांगले आहे. पण ऑफ रोड परफॉर्मन्स SUV कारच्या तुलनेत चांगला नाही.


XUV चा फुल फॉर्म काय?


XUV चे पूर्ण रूप क्रॉसओवर युटिलिटी व्हेईकल (Crossover utility vehicle) आहे. ही कार आकाराने मोठी आहे आणि तिची बिल्ड क्वालिटी खूपच चांगली आहे. या कारला तुम्ही एक प्रकारे मोठी SUV कार देखील म्हणू शकता. कारण बहुतेक फीचर्स SUV आणि XUV मध्ये समान आहेत. मात्र, या कारची बाह्य रचना अतिशय मजबूत आहे. फॅमिली ट्रीपसाठी किंवा लांबच्या प्रवासासाठी ही कार अधिक चांगली आहे.


TUV चा फुल फॉर्म काय?


TUV चे पूर्ण रूप म्हणजे टफ युटिलिटी व्हेईकल (Technischer Überwachungsverein) असा आहे. ही कार एसयूव्ही कारसारखीच आहे, फक्त तिचा आकार एसयूव्ही कारपेक्षा थोडा कमी आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर या कारला तुम्ही एक प्रकारे मिनी एसयूव्ही कारदेखील म्हणू शकता.


महत्त्वाच्या बातम्या : 


Tata Nexon EV : ग्राहकांसाठी खुशखबर! Tata Motors कडून Nexon EV Max ची किंमत कमी; 'हे' असेल खास वैशिष्ट्य


Car loan Information:

Calculate Car Loan EMI