Auto Sales December 2022: देशातील वाहन विक्रीच्या बाबतीत डिसेंबरमध्ये कंपन्यांना तोट्याचा सामना करावा लागला. वार्षिक आधारावर डिसेंबरमध्ये आघाडीच्या वाहन कंपन्यांची विक्री (Auto Sales in December) कमी झाली. यामध्ये मारुती सुझुकी, टोयोटा आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे. मात्र एमजी मोटर्ससारख्या कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाली. एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक पार्टसच्या कमतरतेमुळे उत्पादनावर परिणाम झाला. विशेषत: त्याचा परिणाम देशांतर्गत मॉडेलवर अधिक दिसून आला.


Auto Sales December 2022: देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीच्या विक्रीत घट 


एक्सचेंज फाइलिंगनुसार, डिसेंबरमध्ये मारुती सुझुकीची एकूण विक्री 1.39 लाख युनिट्स होती, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 1.53 लाख युनिट्स होती. म्हणजेच वार्षिक आधारावर वाहन विक्रीच्या आकडेवारीत 9.2 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीतही 10% घट झाली आहे. जारी केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2022 मध्ये 1.17 लाख युनिट्सची विक्री झाली होती. तर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा आकडा 1.30 लाख युनिट्स होता.


Auto Sales December 2022: मारुती सुझुकीच्या निर्यातीचे आकडेही घसरले


मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) डिसेंबरमध्ये 21796 मोटारींची निर्यात केली. डिसेंबर 2021 मध्ये 22280 युनिट्सची निर्यात झाल्यामुळे हा आकडा एका वर्षापूर्वी याच कालावधीत 2.2% कमी होता. त्याचप्रमाणे टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या विक्रीतही वार्षिक आधारावर 3.8% ने घट झाली आहे. कंपनीने डिसेंबरमध्ये 10,421 वाहनांची विक्री केली. तर वर्षभरापूर्वी हा आकडा 10,834 होता.


Auto Sales in December: एमजी मोटरच्या विक्रीत वाढ


निवडक कंपन्या वगळता डिसेंबरमध्ये विक्रीत वाढ झाली आहे. एमजी मोटर इंडिया यापैकी एक आहे. 2022 च्या शेवटच्या महिन्यात कंपनीने वार्षिक आधारावर 53% अधिक वाहने विकली. आकडेवारीनुसार, कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये 3,899 युनिट्सची किरकोळ विक्री केली, तर एका वर्षापूर्वी ही संख्या केवळ 2,550 युनिट्स होती.


Auto Sales in December: आयशर मोटर विक्री 28% वाढली


डिसेंबरमध्ये आयशर मोटर्सची (Eicher Motors) एकूण देशांतर्गत विक्री 6,671 युनिट्सवर पोहोचली. जी मागील वर्षीच्या 5,192 युनिट्सवरून 28.49% जास्त होती. एकूण व्हीईसीव्ही विक्रीचा आकडा पाहिला तर त्यात 17.34% वाढ झाली आहे. ही विक्री 6,154 युनिट्सवरून 7,221 युनिट्सवर वाढली. वाहन क्षेत्रातील आणखी एक कंपनी व्हीएसटी टिलर्सच्या विक्रीच्या आकडेवारीतही वाढ दिसून आली. डिसेंबरमध्ये कंपनीने ट्रॅक्टर विक्रीत 25.25% वाढ नोंदवली.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI