New Electric Bike: इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ADMS ने अलीकडेच बेंगळुरू येथे आयोजित ग्रीन व्हेईकल एक्स्पोच्या तिसऱ्या आवृत्तीत आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक ADMS बॉक्सर (ADMS Boxer) लाँच केली. ADMS ची बॉक्सर इलेक्ट्रिक बाइक हिरो स्प्लेंडर सारखी दिसते. जर तुम्ही बॅटरीचा भाग सोडला तर या बाईकची पुढील ते मागची संपूर्ण रचना हीरो स्प्लेंडरसारखीच आहे.


ADMS Boxer भारतात 1.25 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. या बाईकमध्ये रिव्हर्स मोडसह तीन रायडिंग मोड आहेत. कंपनीने दावा केला आहे की, ही बाईक इको मोडमध्ये 140 किमीची रेंज देऊ शकते. जी याची सर्वोच्च श्रेणी आहे. यात लिथियम-आयन बॅटरी आहे. जी हब माउंटेड मोटरला पॉवर देते. सध्या कंपनीने या बाईकबद्दल जास्त माहिती शेअर केलेली नाही.


या बाईकच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर हिरो स्प्लेंडर प्रमाणेच चौकोनी हेडलाइट, टेल लॅम्प, टर्न इंडिकेटर, सीट आणि मडगार्ड आहे.ही बाईक जावपास स्प्लेंडर प्लससारखी दिसते. बाईकच्या इंजिनच्या डब्यात एक मोठी बॅटरी बसवण्यात आली आहे, जी पांढऱ्या कव्हरने झाकलेली आहे. या बाईकचे सस्पेन्शन सेटअप आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील स्प्लेंडर सारखेच आहे. मात्र ही एक इलेक्ट्रिक बाईक असल्याने एडीएमएस बॉक्सरमध्ये काही विशिष्ट फीचर्स देखील आहेत. जसे की यात भिन्न हँडलबार डिझाइन आणि पोझिशनिंग, क्रोम-टिप्ड ग्रिप आणि अद्वितीय स्विच क्यूब मिळतात.


बाईकच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये इंधन गेजऐवजी बॅटरी इंडिकेटर देण्यात आला आहे आणि याच्या हँडलवर USB चार्जिंग पोर्ट देखील आहे. स्पीड मीटर डाव्या इन्स्ट्रुमेंट पॉडमधील स्प्लेंडरसारखेच आहे. परंतु आतील ग्राफिक्स वेगळे आहेत. कंपनीने बाईकमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर किंवा डिस्प्ले दिलेला नाही. ADMS Boxer इलेक्ट्रिक बाईक पूर्णपणे बंद फेअरिंगसह येते, जे दर्शवते की बाईकची बॅटरी काढता येत नाही. बाईकमध्ये इंधन कॅपऐवजी चार्जिंग सॉकेट देण्यात आले आहे. सध्या कंपनीने बाईकमध्ये लावलेल्या बॅटरीची पॉवर, टॉर्क, फीचर्स आणि वॉरंटी याविषयी माहिती शेअर केलेली नाही.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI