Aurangabad News: राज्यभरात (Maharashtra News) आज शिवजयंती (Shiv Jayanti 2023) मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती (Shiv Jayanti) मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण शहर शिवमय झाले आहे. तर क्रांती चौक परिसर रोषणाई, रंगरंगोटी आणि भगव्या ध्वजांनी उजळून निघाला आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येपासूनच क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींचे जथ्थेच्या जथ्थे दाखल होत होते. सोबतच, जय भवानी... जय शिवाजी... च्या गजराने हा परिसर दणाणून गेला होता.


शिवजयंतीनिमित्ताने शिवप्रेमी, पक्ष, संघटना यांच्याकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात शिवरायांची महाआरती, वाहन रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक आदींसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आज दुपारी 4 वाजता राजाबाजार येथील श्री संस्थान गणपती मंदिर येथून मुख्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ज्यात मोठ्याप्रमाणात शिवप्रेमी सहभागी होतील.




आज दिवसभरातील कार्यक्रम!



  • राववारी सकाळी क्राता चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ध्वजारोहण आणि अभिवादन करण्यात येईल. 

  • दुपारी 12 वाजेपासून वाजेपर्यंत पोवाडा सादरीकरण, दांडपट्टा व तलवारबाजी स्पर्धा, शिवगीत, कविता वाचन, मलखांब प्रात्यक्षिके आदी कार्यक्रम होतील.

  • दुपारी 4 वाजता मुख्य मिरवणूक निघेल, या कार्यक्रमांमध्ये शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, जिल्हा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन कराड यांनी केले आहे.

  • सायंकाळी 6 वाजता शिवगीत ध्वनिक्षेपणावर वाजविण्यात येईल.


हे मार्ग असतील सर्व वाहनांसाठी बंद



  • जय भवानी नगर चौक गजानन महाराज मंदिर व सेव्हन हिल उड्डाणपूल आदिनाथ चौक

  • राजाबाजार, संस्थान गणपती- शहागंज सिटी चौक गुलमंडी. पैठणगेट सिल्लेखाना. क्रांतीचौक गोपाल टी.

  • सिडको एन-12 नर्सरी टी.व्ही. सेन्टर, जिजाऊ चौक. एम. 2, एन. 9. शिवनेरी कॉलनी पार्श्वनाथ चौक बळीराम पाटील चौक - बजरंग चौक आविष्कार चौक शिवाजी महाराज पुतळा - चिश्तिया चौक.


हे असतील पर्यायी मार्ग...



  • शहागंज ते सिटी चौकाकडे येणारी वाहने चेलीपुरा लोटा कारंजा- कामाक्षी लॉज या मार्गाने जातील. 

  • क्रांती चौक ते सिटी चौकाकडे जाणारी वाहने सावरकर चौक, कार्तिकी हॉटेल चौक, मिलकॉर्नर भडकल गेट या मार्गाचा वापर करतील.

  • मिल कॉर्नरकडून औरंगपुयाकडे येणारी वाहने अंजली टॉकीजसमोर उजवीकडे नागेश्वरवाडी निराला बाजार समर्थनगरमार्गे किंवा अंजली टॉकीजजवळ डावीकडे खडकेश्वर म.न.पा. मार्गे जातील.

  • जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टी.व्ही. सेंटरकडे जाणारी वाहने अण्णा भाऊ साठे चौक उद्धवराव पाटील चौक सिद्धार्थनगर चौक या मार्गाचा वापर करतील.

  • जय भवानी नगर ते राजानन महाराज मंदिराकडे येणारी व जाणारी वाहने जालना रोड मार्गाचा वापर करतील.

  • जवाहरनगर पोलिस स्टेशन ते सेव्हन हिलकडे येणारी वाहने माणिक हॉस्पिटल, त्रिमूर्ती चौकमार्गे जातील आणि येतील.