औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असताना आरोग्य यंत्रणावर प्रचंड ताण येत आहे. अनेकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागतोय. औरंगाबादेतही तसं फारसं वेगळ चित्र राहिलं नाही. ऑक्सीजन बेडच्या शोधात रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण सुरु आहे. यातून मृत्यूचं प्रमाणंही वाढत चाललं आहे.
औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या आता 27 हजारांवर पोहोचली आहे, शहरी आणि ग्रामीण भागात दिवसाला 200 ते 250 रुग्ण आढळत आहेत. त्यामुळं आरोग्य यंत्रणा आता मेटाकुटीला आली आहे. लक्षणं असलेली रुग्ण वाढत चालली आहे, औरंगाबाद शहरात सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल मिळून 902 ऑक्सीजन बेड आहेत, तर 343 आयसीयूच्या खाटा आहेत, तर व्हेंटिलेटर 187 आहेत, हे सगळं फुल्ल असताना आता रुग्णांची वणवण सुरु आहे. खास करून शासकीय घाटी रुग्णालयात तर पुरती बोंब झाली आहे. बेड मिळत नसल्यानं रुग्णांची ओरड सुरु आहे, आपतकालीन विभागाबाहेर त्रस्त आणि संतप्त नागरिकांचा त्रागा सुरु असतो.
कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने मंत्रालयातील तीन मंत्री कार्यालये तात्पुरती बंद
आरोग्य यंत्रणांवर ताण
शासकीय रुग्णालयात फक्त शहर आणि जिल्ह्यातीलच नाही तर मराठवाड्यातील सगळीकडूनच रुग्ण येत असल्यानं अडचण वाढली आहे. प्रशासनानं खासगी रुग्णालयांना ऑक्सीजन आणि आयसीयू बेड वाढवण्याचे आदेश दिले आहेत. येत्या 8 दिवसांत हे वाढेलही मात्र वाढणारी रुग्ण संख्या धोकादायक ठरत असल्याचं आरोग्य अधिकारी सांगत आहेत. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडतेय. मात्र, अजूनही काही नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. मनपानं आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या लोकांकडून 17 लाख 49 हजारांचा दंड वसूल केला आहे. यातूनच नागरिकांची बेपर्वाई दिसून येतेय.
औरंगाबाद | 67 वर्ष वृद्ध महिलेला झाडाखाली ऑक्सिजन सिलिंडर,गरवारे कम्युनिटी सेंटरबाहेरचा फोटो व्हायरल