औरंगाबाद : पदावरुन हटवल्यामुळे व्यथित झालेल्या मनसे नेत्याने टोकाचं पाऊल उचललं. औरंगाबादेत मनसे नेते अभय मांजरमकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
राज ठाकरे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील औरंगाबादच्या शहर सहसचिवपदावरुन मांजरमकर यांना काढून टाकण्यात आलं होतं. पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
व्यथित होऊन झालेल्या मांजरमकरांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. अभय मांजरमकर यांच्यावर औरंगाबादच्या घाटी (रुग्णालय) मध्ये उपचार सुरु आहेत.
आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर आणि मनसे नेते राजू पाटील यांना जबाबदार धरलं. आपल्याला अपमानकारक वागणूक आणि त्रास देऊन पक्षातून काढल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मांजरमरकरांनी आरोप केलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांवर काही कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी
पदावरुन हटवल्याने मनसे नेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
30 Dec 2018 08:03 PM (IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील औरंगाबादच्या शहर सहसचिवपदावरुन अभय मांजरमकर यांना काढून टाकण्यात आलं होतं. पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -