Petrol Shortage: औरंगाबाद जिल्ह्यात पेट्रोल पंपावर पेट्रोल-डीझेलची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पेट्रोल-डीझेल घेण्यासाठी लोकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. सिल्लोड तालुक्यातील भराडी गोलेगाव चौकातील अशाच एक पेट्रोल पंपाचा व्हिडिओ समोर आला आहे. शहराला होणारा पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कमी करण्यात आल्याने टंचाई निर्माण झाली आहे. तर महिन्या अखेरीस शहरात भिषण पेट्रोल टंचाईची शक्यता असल्याचा अंदाज यापूर्वीच औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिऐशनच्या पदाधिकाऱ्यांनी वर्तवला होता.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दर वाढ करण्यात आली नसल्याने, तेल कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे शहरात होणार पेट्रोल-डीझेलचा पुरवठा कमी करण्यात आला आहे. औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिऐशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 20 ते 25 टक्के पुरवठा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागात पेट्रोलची टंचाई निर्माण होत आहे. तसेच महिन्या अखेरीस शहरात भिषण पेट्रोल टंचाईची शक्यता असल्याचा अंदाज यापूर्वीच औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिऐशनच्या पदाधिकाऱ्यांनी वर्तवला होता. त्यानुसार ग्रामीण भागात काही ठिकणी पेट्रोलची टंचाई जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पंपावर उसळली गर्दी...
सोशल मिडियावर औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील भराडी गोलेगाव चौकातील पंपाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पंपावर डीझेल घेण्यासाठी लोकांना लाईन लावून उभं राहावे लागत आहे. अनेकजण हातातील कॅन लाईनमध्ये लावून उभा असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. परिसरात पंपावरील डीझेल संपल्याने ज्या ठिकाणी डीझेल आहे त्याठिकाणी लोकांची गर्दी उसळल्याचे पाहायाला मिळत आहे.
यामुळे टंचाई...
दोन आठवड्यापूर्वी औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिऐशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत, 'गेल्या महिनाभरापासून औरंगाबाद शहरातील पंप चालकांना कंपनीकडून नियमित पुरवठा केला जात नसल्याच म्हटल होतं . मागणीनुसार ऑईल कंपन्यांकडून वितरण होत नसल्याने, शहरातील अनेक पंपाचा पेट्रोलसाठा संपत आहे. त्यामुळे पंप बंद ठेवण्याची वेळ औरंगाबाद शहरातील पंपचालकांवर आली असल्याचं असोसिऐशनचे सचिव अखिल अब्बास यांनी म्हटलं होतं.