Aurangabad School News: उद्यापासून जिल्ह्यातील शाळा सुरु होत असून, मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची लगबग सुरु आहे. मात्र मुलांचे प्रेवश करताना अनधिकृत शाळांची पालकांनी माहिती घेऊनच प्रवेश घ्यावे असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील आठ शाळा अनधिकृत असल्याची असल्याचं शिक्षण विभागाने घोषित केले आहे. 


जिल्ह्यात अनेक शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत. यामुळे मुलांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनधिकृत शाळा शोधण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. या आदेशानुसार मान्यता नसलेल्या शाळांची यादी शिक्षण विभागाने सोमवारी जाहीर केली असून, यात जिल्ह्यांतील आठ प्राथमिकसह माध्यमिक शाळांचा समावेश आहे. अशा अनधिकृत शाळांत कोणीही प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


'या' आहेत अनधिकृत शाळा...


शिक्षण विभागाने सोमवारी जिल्ह्यातील आठ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून, ज्यात बेलोहळ येथील सनराईज इंग्लिश स्कूल, वाळूज- रांजणगाव आणि बन्सीलालनगर द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल या शाळांना मान्यता नाही.  उस्मानपुरा येथील मेमार ए डेक्कन उर्दू प्राथमिक शाळा ही अनधिकृत स्थलांतरीत करण्यात आली आहे. बीड बायपासवरील नारायणा ई-टेक्नो स्कूल, झाल्टा फाटा येथील टेंडर केअर होम शाळेला मान्यता आहे पण अनधिकृत स्थलांतर केले आहे. तसेच झाल्टा फाटा येथील जी. एस. एम. ग्लोबल स्कुल आणि शरणापुर फाटा येथील गुरुकुल करिअर अॅव्हेन्यू स्कूल यांनी इरादापत्र मागणीसाठी प्रस्ताव दिला आहे, अद्याप शासनाने मान्यता दिली नाही. त्यामुळे आपल्या पाल्यांचे शाळेत प्रवेश करताना पालकांनी वरील शाळेची यादी पाहून घावीम जेणेकरून फसवणूक होणार नाही.


उद्यापासून शाळा सुरु...


उद्यापासून शाळा सुरु होत असून, याची मोठी उत्सुकता मुलांनी लागली आहे. तर दुसरीकडे शाळा सुरु करण्याची तयारी शाळांमध्ये पाहायला मिळत आहे. बंद असलेल्या खोल्यांची साफसफाई करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे जेवढी उत्सुकता मुलांना लागली आहे तेवढीच शिक्षकांना सुद्धा उत्सुकता लागली आहे. 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI