Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजी नगरमध्ये जी-20 परिषदेच्या (G20 Conference) पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आली असून, शहर चकचकीत करण्यात आले आहे. मात्र असे असताना काही लोकं अस्वच्छता निर्माण करत आहे करत आहेत. तर रस्त्यांवर करण्यात आलेल्या रंगरंगोटीवर काहीजण थुंकीच्या पिचकाऱ्याही मारत आहेत. त्यामुळे अशा लोकांवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहे. शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहे. पोलिसांनी आतापर्यंत अशा 60 लोकांविरोधात गुन्हे दाखल केले आहे.
जी 20 परिषदेचं बहुमान यंदा भारताला मिळाला आहे. त्यामुळे देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये जी-20 परिषदेची बैठक आयोजित करण्यात येत आहे. दरम्यान छत्रपती संभाजी नगरमध्ये देखील दोन दिवस जी-20 परिषदेची बैठक होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, ठिकठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे. मात्र, असे असताना देखील काही लोकं शहरात अस्वच्छता करत असल्याचा पाहायला मिळत आहे. रस्त्यांवर करण्यात आलेल्या रंगरंगोटीवर पिचकाऱ्या मारत आहे. त्यामुळे अशा लोकांविरोधात आता पोलिसांनी धडक मोहीम राबवत कारवाई सुरू केली आहे.
शहरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्या आतापर्यंत 60 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर न्यायालयात खटले देखील दाखल करण्यात आले आहे. तसेच यापुढे देखील सार्वजनिक ठिकाणी मलमुत्र विसर्जन करणे, केरकचरा टाकणे, थुंकणे, अशा प्रकारचे गैरवर्तन करणाऱ्यांविरुद्ध औरंगाबाद शहर पोलीसांमार्फत सातत्यपुर्वक कायदेशीर कारवाई सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली आहे.
विदेशी पाहुण्यांचे आगमन!
जी-20 परिषदेच्या निमित्ताने अनेक देशातील विदेशी पाहुणे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होत आहे. तर यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, शनिवार पासून विदेशी पाहुणे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होण्यास सुरवात झाली आहे. या बैठकीस देश-विदेशांतील महिला बालकल्याण आणि उद्योग, व्यापार क्षेत्रातील 125 प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत. दरम्यान शनिवारी सायंकाळी चार देशांच्या पाहुण्यांचे शहरात आगमनदेखील झाले आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते चिकलठाणा विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.
पोलिसांकडून ड्रोन कॅमेराला बंदी...
जी-20 च्या निमित्ताने वेगवेगळ्या देशातील पाहुणे छत्रपती संभाजीनगर येणार असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला असून, 25 फेब्रुवारी ते 02 मार्चपर्यंत जी-20 परिषदेच्या अनुषंगाने ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रणाकरिता वापर करण्यास मनाई आदेश पोलिसांनी काढला आहे. याबाबत पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी माहिती दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
G-20: विदेशी पाहुण्यांच्या आगमनास सुरुवात; विदेशी महिलांना साडी नेसविणे, बांगड्या भरण्यासाठी खास पथक