Aurangabad News: मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) आणि ठोक मोर्चाच्यावतीने पून्हा एकदा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 28 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद (Aurangabad) गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथील शहीद काकासाहेब शिंदे यांच्या स्मारक स्थळावरून मुंबईतील मंत्रालयावर (Ministry) चार चाकी वाहनांचा लाँग मार्च (Long March) काढण्यात येणार असल्याची माहिती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे (Ramesh Kere) यांनी दिली आहे. औरंगाबादमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. 


यावेळी बोलताना रमेश केरे म्हणाले की, मराठा आरक्षणचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आम्हाला ओबीसीच्या सर्व शैक्षणिक सवलती देण्यात याव्या अशी मागणी मराठा समाजाची आहे. परंतु मराठा समाजाच्या या मागणीकडे शासनाने नेहमीच दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन केले जाणार आहे. ज्यात मुंबईतील मंत्रालयावर चार चाकी वाहनांचा लाँग मार्च काढण्यात येणार असल्याचं केरे म्हणाले आहेत. 


तर याचवेळी बोलताना मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक रवींद्र काळे पाटील म्हणाले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी येथे घेतलेल्या मेळाव्यातून आमच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत. अनेक बँका तरुणांना कर्ज उपलब्ध करून देत नसल्याचे पाहायला मिळत आहे. ही बाब जग जाहीर असताना त्यांनी घेतलेल्या मेळाव्यात किती तरुणांना बँकांनी कर्ज मंजूर केले, याचा जाब नरेंद्र पाटलांना आम्ही विचारणार असल्याचं रवींद्र काळे पाटील म्हणाले आहेत. 


लाँग मार्च अन् मागण्या...



  • 28 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथील शहीद काकासाहेब शिंदे यांच्या स्मारक स्थळावरून लाँग मार्च निघणार 

  • राज्यातील महत्वाचे सर्वच समन्वयक या लाँग मार्चमध्ये सहभागी होतील. 

  • हा  लाँग मार्च अहमदनगरमार्गे चाकण येथे जाऊन पहिल्या दिवशी मुक्कामी राहील.

  • दुसर्‍या दिवशी 1 मार्च रोजी लाँग मार्च मुंबईत पोहोचेल. 

  • यावेळी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल यांनी सहा महिन्यात एकाही बैठक घेतली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला जाईल. 

  • मराठा आरक्षणाबाबत चंद्रकांत पाटिल यांना आस्था नाही, यामुळे त्यांची या पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी आमची मागणी करण्यात येईल. 

  • मराठा आरक्षणासहित प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात येईल. 

  • सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटले असताना मराठा समजाच्या मागण्य पूर्ण होत नसल्याचा आरोप. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Shivjayanti 2023: यंदाची शिवजयंती आग्रा किल्ल्यात साजरी होणार, पुरातत्व विभागाची अखेर परवानगी