माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडीओ प्रसारित करुन दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोबतच, पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी फॅमिली कोर्टात दावा केला आहे. मला रावसाहेब दानवे आणि मुलगी संजना यांनी आत्महत्येस प्रवृत्त केलं. त्यांनी मानसिक आणि सामाजिक त्रास दिला आहे. माझ्या घरी लेडीज कॉन्स्टेबल रावसाहेब दानवे यांनी ठेवल्या आहेत आणि मी घरी गेलो तर त्या माझ्यावर गुन्हा दाखल करतील असं मला सांगितलं जातं.
माझ्या या भूमिकेनंतर रावसाहेब दानवे मोठ्या त्वेषाने अंगावर येतील. परंतु, त्यांना ठोकल्या शिवाय पर्याय नाही. या बरोबरच माझ्याकडे पुरावे आहेत ते मी जर मीडियाला दिले तर रावसाहेब दानवे आणि संजना यांना समाजात तोंड दाखवायला राहणार नाही, असे देखील हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. याबरोबरच यापुढे मला कोणीही रावसाहेब दानवे यांचे जावई म्हणू नये, असं त्यांनी म्हटलं आहे.
सासरे रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरुन मुलावर अॅट्रॉसिटी गुन्हा; हर्षवर्धन जाधवांच्या आईचा आरोप
काही महिन्यापूर्वी राजकारनातून निवृत्ती
राज्याच्या राजकारणातलं चर्चेत असणारं नाव म्हणजे माजी आमदार हर्षवर्धन जाधव. त्यांनी आज अचानक राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या या घोषणेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. काही महिन्यापूर्वी त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता. निवृत्तीची घोषणा करताना ते म्हणाले की, सध्या लॉकडाऊन सरु आहे. अनेकजण आपापले छंद जोपासत आहे. मी देखील माझ्या अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला त्यातून झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेत आहे, माझी उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव असेल, असं जाधव यांनी म्हटलंय.
औरंगाबादमध्ये दिव्यांग मुलांच्या शाळेत मुलामुलींना एकत्र निर्वस्त्र आंघोळ घातली जात असल्याचं समोर