औरंगाबाद : दिवसोंदिवस मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत आहे, चोरीला गेलेल्या मोबाईलच्या गैरवापराचीही अनेकांना भिती वाटते. मात्र, हाच सगळा प्रकार टाळण्यासाठी आता सरकारनचं नवी उपाययोजना केली आहे. आता तुमचा मोबाईल चोरीला गेला तरी सुद्धा तो कुणीही वापरू शकणार नाही. मोबाईल चोरींच्या घटनांचा आकडा मोठा आहे, यालाच काही प्रमाणात चाप लावण्यासाठी केंद्र सरकारनं ही वेबसाईट सुरू केली आहे.


सध्या मोबाईल चोरींच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते आहे. औरंगाबाद सारख्या शहरात महिन्याला किमान 100 वर मोबाईल चोरी आणि हरवण्याची नोंद होते. देशात हा आकडा किती मोठा असेल? यालाच काही प्रमाणात चाप लावण्यासाठी केंद्र सरकारनं एक नवी वेबसाईट सुरू केली आहे. सेंट्रल इक्वीपमेंट आयडेंटीटी रजिस्टर म्हणजे CEIR असं या बेवसाईटचं नाव आहे. जर तुमचा मोबाईल चोरी गेला, तर त्याचा आयएमईआय(IMEI)नंबर तुम्हाला या वेबसाईटवर रजिस्टर करायचा आहे. त्याद्वारे तुमचा मोबाईल डिव्हाईस तातडीनं ब्लॉक करण्याची सुविधा आहे. याची माहिती देशातील सर्व मोबाईल नेटवर्क कंपन्यांना पाठवली जाणार आहे. सोबतच पोलिसांना मोबाईल ट्रँकही करता येणार आहे. चोरी गेलेला वा हरवलेल्या मोबाईलमध्ये कुणी दुसरं सीमकार्ड टाकलं तर तातडीनं याची माहिती तक्रार केलेल्या पोलिस ठाण्यात मिळेल आणि चोर पकडला जाईल.

मोबाईल सापडल्यावर अनब्लॉक करण्याची सोय -
या वेबसाईटवरुन फक्त मोबाईल डिव्हाईस लॉकच करता येणार नाही, तर मोबाईल सापडल्यावर तो अनब्लॉक करण्याची सोय देखील देण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे फक्त मोबाईल चोरी रोखणं इतकाच उद्देश नाही, तर तुम्ही जुना मोबाईल विकत घेत असताना तो चोरीचा आहे का? वा स्वस्तात मोबाईल विकत घेताना तो बनावट तर नाहीना? याचीची तपासणी करण्याची सोय या वेबसाईटवर आहे. नोन युवर मोबाईल(KNOW YOUR MOBILE )या लिंकवर क्लीक करुन त्यावर आयएमईआय नंबर टाकल्यावर क्षणार्धात तो मोबाईल चोरीचा वा बनावट आहे याचीची माहिती यात मिळणार आहे. परिणामी यापुढं तुमचा चोरी गेलेला स्मार्टफोन कुणाच्याही कामाचा राहणार नाहीये. त्यामुळंचं यातून चोरी होण्याचं प्रमाणही कमी होईल असं पोलिसांना वाटतं.

नागरिकांचं बनावट फोननं नुकसान होवू नये, फोन चोरीला गेल्यावरही त्याचा कुणाला उपयोग करता येऊ नये यासाठीच ही बेवसाईट सुरु करण्यात आली आहे. त्यामुळं तुमचा फोन चोरीला गेला असल्यास तुम्ही देखील या बेबसाईटचा नक्कीच वापर करू शकता.

हेही वाचा - एसटीच्या चालक, वाहकांना ऑन ड्युटी मोबाईल वापरास बंदीचं फर्मान

Bus | भंगारातील बसेसचं मोबाईल टॉयलेट, नवी मुंबई महानगरपालिकेची शक्कल | ABP Majha