माझा विशेष | निष्पाप लेक जाळली, विकृतीचं काय?
त्यानंतर पालकांनी या घटनेची खातरजमा करण्यासाठी इमारती मधील सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये विकृतीचे किळसवाणे वर्तन दिसून आले. यानंतर पालकांनी निजामपुरा पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलांची कैफियत सांगितली असता पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे विकृत कमलेश जैन यास त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याविरोधात भादवि कलम 354 सह पोस्को कायद्या अंतर्गत कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करत अटक केली आहे. अटक केल्यानंतर भिवंडी न्यायालयात आरोपीस हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव भुसारे करीत आहेत .भिवंडीत मुलांसोबत विकृत चाळे करण्याचा प्रयत्न, सीसीटीव्हीतून संतापजनक प्रकार उजेडात, विकृतास बेड्या
अनिल वर्मा, एबीपी माझा | 04 Feb 2020 05:00 PM (IST)
बलात्काराच्या घटना वाढत चालल्याचे दिसत असताना अशा घटनांमध्ये लहान मुलांना देखील वासनेची शिकार बनविल्याच्या घटना समोर आल्या आहेत. समाजात वासनांध आणि विकृत लोकांची नजर लहान मुलांवर आहे. असाच एक प्रकार भिवंडीत समोर आला आहे. सुदैवाने मुलांच्या प्रसंगावधानाने काही दुर्देवी प्रकार घडला नाही, मात्र जे घडलं ते संतापजनक आहे.
भिवंडी : भिवंडी शहरात आदर्श पार्क परिसरातील निवासी इमारतींच्या मोकळ्या जागेत खेळणाऱ्या मुलांसोबत विकृत लैंगिक चाळे करणाऱ्या विकृताला पोलिसांनी अटक केली आहे. लहान मुलांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत आपल्या घरी पालकांना सांगितल्याने काही दुर्देवी प्रकार घडला नाही. पालकांनी इमारती परिसरात सुरक्षिततेसाठी लावलेले सीसीटीव्ही तपासले असता मुलांची तक्रार खरी निघाली. संताप आणणारा हा प्रकार समोर आल्यावर पालकांनी निजामपुरा पोलीस ठाणे गाठून त्या व्यक्तीविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी 36 वर्षीय आरोपी कमलेश जैन या विकृतास अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. आदर्श पार्क या परिसरातील 4 ते 9 वर्ष दरम्यानची लहान मुलं इमारतीखाली सोबत खेळत होती. त्यावेळी एक डोक्यावर टोपी घातलेला विकृत इसम आपले गुप्तांग बाहेर काढून त्या ठिकाणी आला. त्याने तेथील लहान मुलांच्या सोबत विकृत लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलांनी घाबरून घरात पळ काढला. मुलांच्या मनामध्ये त्या विकृत व्यक्तीबद्दल भीती होती. एका मुलाला त्याच्या आईने कपडे बदलण्यास सांगितले असता त्याने घाबरून अंकल येईल असे सांगत कपडे बदलण्यास नकार दिला. त्या मुलाच्या पालकांनी मुलांकडे आस्थेवाईक चौकशी केली असता हा धक्कादायक आणि संताप आणणारा प्रकार समोर आला.