Astrology Panchang Yog 1 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जून महिन्याचा पहिला दिवस आहे. आज चंद्राने मीन राशीत प्रवेश केला आहे. तसेच, आजच्या रविवार असल्या कारणाने आजच्या शुभ राशीच्या लोकांवर सूर्यदेवाची कृपा असणार आहे. आज सूर्य नारायण वृषभ राशीत बुध ग्रहाबरोबर युती करुन बुधादित्य योग निर्माण झाला आहे. त्याचबरोबर, आश्लेषा नक्षत्र आणि ध्रुव योगाचा देखील शुभ योग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या लोकांवर होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणू घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. तसेच, आज तुमच्या कलात्मक क्षमतेला चांगला वाव मिळेल. रविवार असल्या कारणाने आजचा दिवस फार आरामात जाईल. आज तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तसेच, तुमची नियोजित कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, मित्रांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. तुम्हाला आर्थिक सुविधांचा लाभ घेता येईल. तसेच, सामाजिक कार्यात तुमचा विकास पाहायला मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न आणि शांत वातावरण पाहायला मिळेल. तुमच्यातील संवादशैली चांगली दिसून येईल. तुम्हाला सुख सुविधांचा लाभ घेता येईल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. तुमची नियोजित कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. नोकरदार वर्गातील लोकांना नवीन नोकरीची संधी मिळेल. तसेच, आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस सकारात्मकतेचा असणार आहे. जी तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी तुम्हाला करता येतील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांचा सपोर्ट मिळेल. तुमच्या पार्टनरबरोबर तुम्हाला चांगला वेळ घालवता येईल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस यशाचा असणार आहे. तसेच, सूर्यदेवाच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. ज्या तुमच्या समस्या आहेत त्या हळुहळू दूर होतील. लहान मुलांच्या कलात्मकतेला चांगला वाव मिळेल. तसेच, संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Horoscope Today 1 June 2025 : आज जून महिन्याचा पहिला दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार वरदान; सूर्यदेवाचा मिळणार आशीर्वाद, आजचे राशीभविष्य