Horoscope Today 1 June 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 1 जून 2025, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. कारण आज शनि जयंती आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीखंडोबाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज आपले कुठे चुकते हे बघणे आवश्यक ठरेल, पैशाची बाजू थोडी सुधारली तरी त्या मनाने खर्चही वाढेल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज पैसा जास्त मिळवण्यासाठी योग्य नियोजन आणि थोडा अंतर्मुख होऊन सर्व बाबतीत विचार करणे गरजेचे ठरेल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज सुख मानून घ्यावे लागेल, भावंडांशी थोडे मतभेद संभवतात 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज जेवढी समाधानी वृत्ती ठेवाल, तेवढे सौख्य लाभेल कर्माचे स्वातंत्र्य घ्याल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज ईश्वराची साथ तुम्हाला नक्कीच चांगली मिळणार आहे, अडचणींवर मात कराल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज तुमच्या इष्ट देवतेची उपासना केल्यास यश मिळेल, काळजी न करता निर्धास्थ राहावे 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्यातील अंत स्फूर्ती जागृत होऊन तुमची कामे मार्गी लागतील 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढे जावे, छोट्या मोठ्या समस्यांनी मन भरकटेल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज कोणत्याही तणावाला बळी न पडता, नेटाने काम चालू ठेवावे व कामाचे योग्य नियोजन करावे  

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज अनावश्यक गोष्टींना फाटा देऊन आपली इच्छाशक्ती आणि उत्साह वाढवल्यास यश मिळेल    

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज दुप्पट वेगाने कामाला सुरुवात कराल, अडथळ्यांची शर्यत पार कराल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज नकारात्मक विचार झटकून टाकून सकारात्मक नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन ठेवा, पुढे जाल.

हेही वाचा :

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जूनचा पहिलाच आठवडा टेन्शनचा की भाग्याचा? कसा जाणार आठवडा? साप्ताहिक राशीभविष्य वाचा 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)