मुंबई : दिग्गज अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर (Saif Ali Khan Attack) बॉलिवुडमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी घडलेल्या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं असून सैफ अली खानच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. सध्या सैफच्या प्रकृतीत सुधारणा होत असून अनेक बॉलिवुड सेलिब्रिटी त्याला भेटायला येत आहेत. असे असतानाच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरदेखील एकत्र सैफ अली खानची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. 


अनेक वर्षांपासून होते रिलेशनशीपमध्ये


अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांना पुन्हा एकदा एकत्र पाहून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. कारण बरीच वर्षे हे दोघेही रिलेशनशीपमध्ये होते. विशेष म्हणजे या दोघांनीही त्यांचं नातं सार्वजनिकरित्या मान्य केलं होतं. त्यामुळे या कपलची सगळीकडे चर्चा असायची. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले आहे. आता दोघेही सिंगल आहेत. असे असताना सैफ अली खानच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. 


अर्जुनने सांगितले होते मी सिंगल आहे


अर्जुन कपूरने त्यांच्या नात्याबाबत एकदा सार्वजनिकरित्या आता मी सिंगल आहे, असं सांगितलं होतं. त्यानंतर अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब झाले होते.  त्यांच्या नात्यावर सार्वजनिकरीत्या प्रतिक्रिया दिल्यानंतर यावर मलायका अरोराला काय वाटते, असे विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देताना, अर्जुन कपूरने काय बोलावं आणि काय नको हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी त्याला काहीही करू शकत नाही. मात्र मला यावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असे मलायका अरोरा म्हणाली होती. 






आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी 


दरम्यान, सैफ अली खानवर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीचे नाव मोहम्मद शहजाद असे आहे. त्याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत असून या हल्ला प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सैफवर हल्ला करणारा आरोपी हा मुळचा बांगलादेशचा आहे. तो अवैधरित्या भारतात घुसलेला आहे. 


हेही वाचा :


मोठी बातमी! चाकूहल्ला करणारा पुन्हा सैफ अली खानच्या घरात घुसणार, पोलीस 'तो' प्रसंग रिक्रिएट करणार?


'टीव्हीवर पाहिलं, मग समजलं हिरोवर हल्ला केला', सैफ अली खानवर चाकूचे वार करणाऱ्या माथेफीरुची धक्कादायक माहिती समोर!


'आशिकी'तल्या राहुलने तरुणाईला प्रेम शिकवलं, पण नंतर बॉलिवुडमधून गायब; 'हा' अभिनेता नेमका कुठे गेला?