Aquarius Horoscope Today 10th March 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. व्यवसायात नवीन कामे सुरु होतील. जे लोक प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना उद्या चांगली डील मिळेल. पण प्रॉपर्टीच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आज तुम्ही तुमच्या प्रियकराबरोबर जास्त वेळ घालवा जेणेकरुन तुम्हा दोघांना एकमेकांना अधिक जाणून घेण्याची संधी मिळेल.


तुमच्या वैयक्तिक बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची तुमच्या कुटुंबियांशी ओळख करुन देऊ शकता. जेणेकरुन तुमच्या लग्नाला आणखी विलंब होणार नाही. तसेच, घरच्या वरिष्ठ सदस्यांकडून पैशांची बचत कशी करावी हे शिकून घ्या, जेणेकरुन भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होईल. याचं कारण आज तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध पैसे खर्च करावे लागतील. 


कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबाबत तुम्हाला सतत चिंता राहील. वरिष्ठांकडून धनलाभ होईल. छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नोकरदार लोक नोकरीसोबत व्यवसाय करण्याची योजना आखू शकतात. त्यात तुमच्या मित्राचा देखील सहभाग असेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.


आजचे कुंभ राशीचे आरोग्य :


मानसिक तणावाची समस्या मधुमेह बाधितांना त्रास देऊ शकते, त्यामुळे नियमित तपासणी आणि औषधांबाबत गाफील राहू नका.


कुंभ राशीसाठी आजचे उपाय :


ध्यान आणि योगासने करत राहणे फायदेशीर ठरेल.


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 10th March 2023 : कन्या, तूळ, मीन राशीच्या लोकांना नोकरीत चांगली बातमी मिळेल; जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य