Horoscope Today 10th March 2023 : आजचा दिवस शुक्रवार हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या यांसह सर्व राशींना सुख आणि समृद्धी मिळेल. या दिवशी कोणाला मिळेल यश? कोणत्या राशीसाठी आजचा दिवस सुवर्णसंधीचा असेल? यासाठी जाणून घ्या आजचं राशीभविष्य.


मेष


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. आज तुमच्याकडे काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा आणि समज दोन्ही असेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करण्याची संधी आहे. जे युवक वडिलोपार्जित व्यवसाय करत आहेत, त्यांना वडिलोपार्जित व्यवसायात बदल करून पुढे जाता येईल. यामध्ये त्यांना कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. जे समाज कार्यात काम करतात, त्यांचा आज सन्मान वाढेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांना संमेलनाला संबोधित करण्याची संधी मिळणार आहे.


वृषभ


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्यानंतर व्यवसाय करणारे लोक खूप आनंदी होतील. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि व्यवसायाशी संबंधित प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.


मिथुन 


मिथुन राशीच्या लोकांसाठी आज नशीब तुमच्याबरोबर असेल. तुम्ही कोणतेही काम कराल, त्यात तुम्हाला यश मिळेल. नोकरीत बढतीची संधी मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीतही जागा बदलण्याची शक्यता आहे. तुमच्या नशिबाच्या जोरावर तुम्हाला मोठी संधीही मिळू शकते.


कर्क


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आजचा संपूर्ण दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर घालवाल आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पैसे कसे वाचवायचे हे शिकू शकाल. वरिष्ठांकडून तुमच्यावर काही काम सोपवले जाईल, जे तुम्ही पूर्ण करावे, नाहीतर ते नाराज होऊ शकतात. तुम्ही आधी काही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल.


सिंह 


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला तुम्ही व्यवसायात केलेल्या नवीन करारामुळे फायदा होईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उघडल्याने आर्थिक समस्या दूर होतील. नोकरदार लोकांना आज त्यांच्या कार्यक्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वरिष्ठ आणि कनिष्ठांचे सहकार्य मिळेल. जे कामाच्या शोधात आहेत, त्यांना आणखी कष्ट करण्याची गरज आहे.


कन्या 


कन्या राशीसाठी आजचा दिवस यशाने भरलेला असणार आहे. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला तुमच्या नोकरीत बढतीच्या संधी मिळतील. जोडीदाराकडून चांगलं यश मिळाल्यास कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. घरामध्ये हवन, पूजा, पाठ इत्यादींचं आयोजन केले जाईल, ज्यामुळे लोकांची ये-जा असेल.  


तूळ 


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नोकरीत बढती होण्याची शक्यता आहे. दिलेली कामे वेळेवर पूर्ण कराल. अधिकाऱ्यांकडूनही प्रशंसा मिळेल. आज मात्र, कोणाच्या सांगण्यावरून गुंतवणूक करू नका. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. व्यवसायात तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल, तरच तुमची कामे मार्गी लागतील.


वृश्चिक


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार जाणवतील. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या शिक्षणात यश मिळेल. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांच्या मेहनतीला यश येईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आज तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्धही प्रवासाला जावे लागेल, जिथे तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करावे लागेल.


धनु


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. आज तुम्हाला नोकरीसंदर्भात चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक स्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कामात येणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला लाभ मिळतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. 


मकर


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंद राहील, सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. घरोघरी हवन, पूजा, पाठ आदींचे आयोजन केले जाईल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील काही अडचणींसाठी त्यांच्या मित्रांची मदत घेतील, ज्यामध्ये त्यांना यश मिळेल. तुम्ही लवकरच तुमचे घर बांधण्यासाठी किंवा विकत घेण्याची तयारी सुरू करू शकता.


कुंभ


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. व्यवसायात नवीन कामे सुरू होतील. जे लोक प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना उद्या चांगली डील मिळेल. पण प्रॉपर्टीच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आज तुम्ही तुमच्या प्रियकराबरोबर जास्त वेळ घालवा जेणेकरून तुम्हा दोघांना एकमेकांना अधिक जाणून घेण्याची संधी मिळेल.


मीन


मीन राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. सर्व क्षेत्रांतून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. नोकरीत प्रगती झाल्यानंतर नोकरदार लोक खूप आनंदी दिसतील. पदातही वाढ होणार आहे. पैसे येण्याचे संकेत आहेत. कुटुंबात काही तणाव संभवतो. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा दिवस असेल. दिलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 09th March 2023 : आजचा गुरुवार 'या' राशींसाठी भाग्याचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य