Apple iPhone17 Launch : भारतात 'iPhone 17' च्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. मुंबईतील वांद्रे आणि बीकेसी येथील 'Apple Store' बाहेर पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे चित्र आहे. तर दिल्ली, बंगळूरु, पुणे आणि हैदराबाद येथील स्टोअर्सबाहेरही अशीच गर्दी पाहायला मिळत आहे. 'iPhone 17' ची किंमत 80 हजार ते दोन लाखांपर्यंत आहे. देशाच्या विविध भागातून नागरिक 'iPhone 17' खरेदी करण्यासाठी मुंबईत आले आहेत. काही जण तर अहमदाबादमधूनही आले आहेत. एका ग्राहकाने सांगितले की, "मी सकाळी 5 वाजल्यापासून येऊन उभा आहे. दुसरीकडे मुंबईत आयफोन 17 च्या खरेदीवेळी चक्क हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. बांद्र्यातल्या जिओ सेंटरमधल्या स्टोअरबाहेर हि हाणामारीची घटना घडली आहे. ग्राहकांची मोठी गर्दी उसळल्याने सुरक्षा कर्मचारीही अपुरे पडल्याचे चित्र आहे. परिणामी रांगेतल्या काहींकडून मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केलाय.

Continues below advertisement

आयफोन 17 खरेदीसाठी झुंबड; ग्राहकांमध्ये हाणामारी

देशभरात आजपासून आयफोन 17 ग्राहकांच्या प्रत्यक्ष हातात येणार आहे. त्यामुळे या फोनच्या खरेदीसाठी मोठी गर्दी उसळल्याचे चित्र आहे. अशातच कंपनीने दावा केला आहे की, हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट 'iPhone' आहे. हा फोन स्लिम, वजनाने हलका आणि अत्याधुनिक ग्राफिक्स कार्डसह उपलब्ध आहे. 'टेक' प्रेमींमध्ये या नवीन 'iPhone' बद्दल मोठी उत्सुकता आहे. दरम्यान ॲपलचा आयफोन 17 लाॅन्च सोबतच अनेक आॅफर्स देखील ह्यासोबत उपलब्ध झाला आहेत. आयफोन 17 ची विक्री 82 हजार 900 रुपयांना जरी होत असली तरी अनेक आॅफर्स उपलब्ध झाल्याने कमी किंमतींमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. सोबतच, आयफोन एअर, आयफोन 17 प्रो आणि प्रो मॅक्स देखील विक्रीसाठी उपलब्ध झालाय.

नवीन आयफोन 17 ची प्रमुख वैशिष्ट्ये

यावेळी अॅपलने कॅमेरा गुणवत्ता, प्रोसेसर गती आणि बॅटरी कामगिरीमध्ये विशेषतः सुधारणा केली आहे. तंत्रज्ञान तज्ञांचे म्हणणे आहे की, आयफोन 17 मध्ये एआय-आधारित वैशिष्ट्ये, जलद चार्जिंग आणि पूर्वीपेक्षा सडपातळ आणि हलके डिझाइन आहे. नवीन आयफोनमध्ये आयफोन एअर देखील समाविष्ट आहे, जो आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन असल्याचे म्हटले जाते. त्याची जाडी फक्त 5.6 मिमी आहे. याव्यतिरिक्त, अॅपलने तीन नवीन आयफोन 17 मॉडेल लाँच केले आहेत. अॅपल वॉच सिरीज 11, अॅपल वॉच अल्ट्रा 3, अॅपल वॉच एसई 3 आणि एअरपॉड्स प्रो 3 इयरबड्स.

Continues below advertisement

 iPhone Air – सर्वात हलका, पातळ आणि स्टायलिश iPhone

• 6.3’’ Super Retina XDR डिस्प्ले• नवीनतम A19 चिप – वेगवान परफॉर्मन्स• ProMotion 120Hz डिस्प्ले + 3000 nits ब्राइटनेस• Ceramic Shield 2 – 3 पट जास्त स्क्रॅच रेसिस्टन्स• 256GB स्टोरेजपासून सुरुवात• 48MP Dual Fusion कॅमेरा + 2x टेलिफोटो• Center Stage फ्रंट कॅमेरा• Action Button + Camera Control• Apple Intelligence – AI आधारित स्मार्ट फीचर्स

iPhone 17 केवळ हलका आणि पातळ नाही तर डिझाईन आणि टिकाऊपणातही अव्वल आहे.

 iPhone 17 Pro – परफॉर्मन्स आणि कॅमेराचा कमाल संगम

• 6.5’’ Super Retina XDR डिस्प्ले• वेगवान A19 Pro चिप• 48MP Fusion Camera (24mm, 28mm, 35mm, 52mm लेन्स)• 24MP डिफॉल्ट फोटो आउटपुट• Dual Capture + Action Mode• Dolby Vision 4K60 Recording• Spatial Audio सह Audio Mix• 80% Recycled Titanium बॉडी• ऑल-डे बॅटरी लाईफ

 

महत्वाच्या बातम्या: