गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड 9 (Maharashtra-Chhattisgarh) सीमेजवळील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलमने घातपात घडवण्यासाठी तळ उभारला होता. मात्र हा तळ उध्वस्त करण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-60 चे सुमारे 200 जवान विशेष अभियानावर होते.  दरम्यान आज सकाळी (12 मे)  जंगल परिसरात शोध घेत असताना नक्षलवाद्यांनी (Naxalites) जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. सी-60 जवानांनीही प्रत्युत्तर दिले. ही चकमक तीन वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास दोन तास चालू होती.  (Anti Naxal Operation In Chhattisgarh)

नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त, मोठा शस्त्रसाठा जप्त

चकमकीनंतर परिसरात करण्यात आलेल्या शोधमोहीमेदरम्यान एक स्वयंचलित इन्सास रायफल, एक सिंगल शॉट रायफल, एक मॅगझीन, अनेक जिवंत काडतुसे, डिटोनेटर, एक रेडिओ, तीन पिट्टु (सामानाची पिशवी), वॉकीटॉकी चार्जरसह मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य आणि वैयक्तिक वस्तू सापडल्या. नक्षलवाद्यांचा तळ सी-60 जवानांनी पूर्णतः उद्ध्वस्त केला असून चकमकीत काही नक्षलवादी जखमी अथवा ठार झाल्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, कोम्बिंग ऑपरेशन सुरु

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिणी टोकावर महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर "कवंडे" जवळ (महाराष्ट्राच्या सीमेत) C-60 चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक घडली. आज सकाळी (12 मे) थोड्या थोड्या वेळानंतर त्याच परिसरात तीन ठिकाणी चकमक झाली. सुमारे दोन तास ह्या चकमकी चालल्या. जवानांनी नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रतिउत्तर दिल्यामुळे नक्षलवादी पळून गेले. मात्र, काही नक्षलवादी जखमी झाले असून त्यांना नक्षलवादी सोबत घेऊन गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन बंदुकी, मोठ्या संख्येने जिवंत काडतूस व इतर नक्षली साहित्य जप्त केले असून नक्षलवाद्यांचे कॅम्प नष्ट करण्यात आले आहेत. सध्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. छत्तीसगड राज्याच्या दंतेवाडा, बिजापूर क्षेत्रातील गीदम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गीरसापारा, नेलगोडा, बोडगा आणि इकेली जंगल परिसरात नक्षलवादी कॅम्प लागल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली आहे. य भागात नक्षलवादी असल्याने पोलिस प्रशासन सतर्क आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या