Anjali Damania on Dhananjay Munde मुंबई :  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Resign) यांनी आपल्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. मात्र असे असताना धनंजय मुंडे यांनी अद्याप सरकारचे 'सातपुडा' हे निवासस्थान रिकामं केलेलं नाही. मुंबईत आपल्याला कुठेही घर नसल्यामुळं बंगला सोडला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी आधी माध्यमांशी बोलताना दिलं होतं. अशातच गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी मुंबईत गिरगाव चौपाटीवर असलेल्या या घराचा उल्लेख केलेला आहे. हे घर सध्या वापरामध्ये नाही, अशी माहिती आहे. यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे चर्चेत आले आहेत.

दरम्यान याचं मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) या आक्रमक झाल्या आहेत. पुढच्या 48 तासात घर खालीकरून सरकारने प्रलंबित 46 लाखांचा दंड देखील वसूल करावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी सरकारला लीगल नोटीस पाठवणार असल्याचा पवित्राही त्यांनी घेतला आहे. त्यामुळे यावर प्रशासन नेमकं काय कारवाई करतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया?

धनंजय मुंडे जेव्हा सरकारी बंगला वापरत होते तेव्हा ते पहिल्यांदा म्हणाले होते की, माझं मुंबईत घर नाही आणि मला तब्येतीमुळे आणि मुलीच्या शिक्षणामुळे मुंबईत राहणं गरजेचे आहे. तेव्हा देखील आपण म्हटलं होतं की त्यांनी घर भाड्यावर घेऊन राहावं. पण आता कायद्याप्रमाणे त्यांना सातपुडा बंगला खाली करणे भाग आहे, क्रमप्राप्त आहे. पण आत्ताच्या घटकाला आपल्याला दिसतंय की त्यांच्या 2024 च्या एफिडेबिटवर वीरभवन नावाचा एक बिल्डिंग आहे. जिथे 902 नंबरचा फ्लॅट म्हणजे 2151 स्क्वेअर फिटच्या बहुतेक तो चार बेडरूमचं घर असावं, तोच फ्लॅट मंत्री सताना देखील होता.

मात्र आजही सातपुडा बंगला ठेवणे हे अतिशय चुकीचा आहे. आम्ही आज एक लीगल नोटीस सरकारला पाठवणार आहे. जर 48 तासात ते बंगला खाली करत नसतील आणि 46 लाखाचा आत्तापर्यंत थकबाकी असलेले दंड आहे तो देखील देत नसतील तर आम्ही सरकारला प्रश्न करू. हा दंड देखील वसूल करण्यात यावा आणि तातडीने मुंडे यांची रवानगी त्यांच्या घरी करण्यात यावी. 48 तासात त्यांनी ते घर खाली करावं, असा इशाराहि अंजली दमानिया यांनी दिला आहे.

जैन समाजातील डॉक्टर्सने त्यांच्या समाजाला समजावण्याचा प्रयत्न करावा- अंजली दमानिया

जैन समाज अतिशय शांतप्रिय समाज आहे. जैन समाजातील चेस्ट फिजिशियन डॉक्टर्सने त्यांच्या समाजाला समजावण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी मी केली आहे. हे जर सरकार कडून घडवण्यात आलं तर अतिउत्तम. कबुतरांच्या विष्ठेमुळे बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन, रेस्पिरेटी दिसोर्डर या सगळ्या गोष्टी होतात. हे जर त्यांच्या समाजाच्या डॉक्टरने जैन मुनिना समजावलं तर बरं होईल. उगाच वाद करण्यात काही पॉईंट नाही. आताच्या घटकाला या सगळ्या गोष्टी त्या समाजाला समजावल्या पाहिजेत. काही प्रथा रूढी त्या जर जीवाला घातक ठरत असतील तर त्या थांबवायला हव्यात. ही समज त्यांना जर व्यवस्थितपणे दिली तर हा वाद नक्कीच मिटेल. असेही अंजली दमानिया म्हणाल्या.

इतर महत्वाच्या बातम्या