अमरावतीः देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असनाता अमरावती येथे आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास काही समाजकंटकांकडून भाजप आमदाराने तयार केलेल्या हर घर तिरंगा रथावरील पंतप्रधान आणि आमदाराचे फोटो फाडले आहे. या घटनेमुळे अमरावतीत भाजप नेते आक्रमक झाले असून ही कृती करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करुन अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे. शहरातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांची गर्दी जमा होण्यास सुरुवात झाली आहे.