Radhakrishna Vikhe Patil : सध्या देशातील अनेक राज्यात लम्पी स्कीन आजारानं (Lumpy Skin Disease) थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातही जनावरांना या लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं सध्या पशुपालक चिंतेत आहेत. मात्र, मागील 15 ते 20 दिवसांच्या तुलनेत गेल्या दोन तीन दिवसात लम्पीचा प्रादुर्भाव कमी झाल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. याचे कारण म्हणजे आत्तापर्यंत आपण 70 टक्के लसीकरण पूर्ण केलं आहे.  72 लाख पशुधनाचे लासीकरण पूर्ण केल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.

Continues below advertisement

उपचारवेळी डॉक्टरांनी निष्काळजी केल्यास कारवाई होणार

राजस्थान आणि पंजाबच्या तुलनेत आपल्या राज्यात जनावरांचा मृत्युदर कमी आहे. आपण मृत्यू झालेल्या दुधाळ गाईंना 35 हजार, बैलांना 25 हजार अशी मदत देत असल्याचे विखे पाटील म्हणाले. सध्या औषध आणि लसीकरणाचा खर्च राज्य सरकार करीत आहे. तसेच यावेळी उपचारवेळी डॉक्टरांकडून काही निष्काळजी झाल्याचे दिसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील विखे पाटील यांनी दिली. राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. वरुड तालुक्यातील पुसला येथे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विखे पाटील यांनी वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट येथे लम्पीबाधित जनावरांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सध्या महाविकास आघाडी सरकार असतं तर....

सध्या जनावरांना लंम्पी स्कीन आजाराची लागण होत आहे. राजस्थानमध्ये लम्पी स्कीनमुळं 62 हजार जनावरांचा आणि पंजाबमध्ये 22 हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. पण महाराष्ट्रात आपण लसीकरण सुरू केलं आहे. त्यामुळं आता हा रोग कमी झाला असल्याचे विखे पाटील म्हणाले. सध्या जर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असते तर यात कमिशन मिळतं का ते पाहलं असतं अशी बोचरी टीका विखे पाटील यांनी केली. लम्पी आजार सुरु झाल्यावर राज्यातील पशु ऑफिसमध्ये फक्त शिपाई राहीला, सगळ्या अधिकाऱ्यांनी फिल्डवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. त्याचा आढावा मी दररोज घेत असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली आहे.

Continues below advertisement

महत्त्वाच्या बातम्या: