Gram Panchayat Election Amravati: ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी (Gram Panchayat Election) आता जोमात असून प्रचारासाठी (election campaign) उमेदवारांकडे फक्त दीड दिवस शिल्लक राहिला आहे. आज आणि उद्या, 16 डिसेंबरला सायंकाळी पाच वाजतापासून जाहीर प्रचार बंद होणार आहे. रविवारी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींची निवडणूक 18 डिसेंबरला होणार असून सरपंचपदासाठी 1279 तर सदस्य पदासाठी 4796 उमेदवार रिंगणात आहेत.


जाहीर प्रचार करताना वैयक्तिक भेटींवर उमेदवार भर देताना दिसत आहेत. निवडणूक (Election) असलेल्या गावांमध्ये रोजच्या जेवणावळी उठत आहेत. सोबतच उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून आकडेमोड केली जात आहे. तळीरामांसाठी देखील रोजच्या रोज 'व्यवस्था' केली जात आहे. त्यासाठी सायंकाळी कामावरून आलेले लोक थेट 'बैठकीकडे' धाव घेताना दिसतात. 


विशेष म्हणजे यापूर्वी सहा सरपंच व 413 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. 14 तालुक्यांतील 2 हजार 97 पदांसाठी 4 हजार 796 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे 257 सरपंचपदासाठी तब्बल 1279 उमेदवार झुंज देत आहेत. यंदा थेट सरपंचपदाची निवडणूक असल्याने चुरस आणखी वाढली आहे.


अपक्ष, बंडखोरांची डोकेदुखी


नामांकन माघारीच्या दिवशी अनेक बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांनी आपले मोबाईल 'स्विच ऑफ' ठेवून प्रस्थापितांना जोरदार धक्का दिला आहे. पॅनलमध्ये स्थान न मिळाल्याने अनेक नाराजांनी स्वतंत्रपणे सरपंच आणि सदस्य पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. मात्र त्यांची समजूत काढताना वरिष्ठ नेतेमंडळींची चांगलीच दमछाक होत आहे.


ऐनवेळी होणार गेम?


अनेक अपक्ष तसेच बंडखोरांनी आपले अर्ज कायम ठेवले असले तरी गावातील सोयीचे राजकारण पाहता ऐनवेळी आपल्याच उमेदवाराला बंडखोरांकडून मदत कशी होईल, याची चाचपणी नेतेमंडळी करीत आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी राजकीय परिस्थिती पाहून कुणाचा 'गेम' होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.


नागपूर जिल्ह्यात 236 सरपंच पदांसाठी 761 उमेदवार


राज्यात सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका (Gram Panchayat Election)पार पडत आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 236 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक होत असून त्यासाठी 761 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहे. तर याच 236 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 2054 सदस्य पदासाठी एकूण 4891 उमेदवार रिंगणात आहे.


ही बातमी देखील वाचा


नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींची चुरस, सव्वादोनशेहून अधिक ग्रामपंचायतींमधील 761 उमेदवार सरपंचपदासाठी रिंगणात