अमरावती : सध्या मचा महायुतीमधून बाहेर पडण्याचा कोणताही विचार नाही, जर महायुतीमधील लोकांना जर वाटलं तर आमची नाराजी काही नाही. गेल्या 20 वर्षांपासून झेंडा आणि नेता नसताना अपक्ष निवडून येत आहे. बाकीच्यांची तुलना माझ्यासोबत करायची नाही. आम्ही धर्म जातीच्या भरोशावर निवडून आलेलो नाही, आमचा नेता मुंबई, दिल्लीत नाही तो गावी बसला आहे, अशा शब्दात प्रहारचे बच्चू कडू (Bachchu Kadu on Mahayuti) यांनी तोफ डागली आहे. आम्ही सागरातल्या लाटा आहोत हे राणेला माहीत नसेल. काय करायचं याबाबतीत वाचता करू नये. मी तुम्हाला मानतो, तुम्ही उगाच काही अधिक मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही अमरावतीपुरतं लढतो आहे आणि मैत्रीपूर्ण लढतो आहे, असेही ते म्हणाले. नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत. 


तर खुशाल कारवाई करण्यास मोकळे आहेत


ते म्हणाले की, फडणीस साहेबांना मुद्दामून सांगत असून मी शिंदे साहेबांचा आजही आदर करतो. चांगले मित्र आहेत. त्यांचे ऋण आमच्यावर आहेत. त्यांनी दिव्यांग मंत्रालय आमच्या दिव्यांगासाठी दिलं हे आयुष्यभर आमच्या डोक्यात राहील, पण राजकारणात काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. आमची प्रहार संघटना जर अमरावतीत तुटत असेल, तर आता आम्हाला बाहेर निघणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही आमची अमरावतीची सीट आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहे. त्यांना जर वाटलं बच्चू कडूंना धर्म युतीचा धर्म पाळला नाही तर खुशाल कारवाई करण्यास मोकळे आहेत. आमची जी लढाई आहे ती अमरावतीपुरती आता मर्यादित आहे आणि ती जागा आम्ही लढणार आणि जिंकणार आहोत. 


विषय हद्दपार होता कामा नये 


बच्चू कडू म्हणाले की, मूकबधिर विद्यार्थ्यांनी सातवीनंतर शिकायचं नाही, असे एकंदरीत धोरण दिसते. हे महत्त्वाचे विषय घेऊन आपण लढलो पाहिजे. विषय हद्दपार होता कामा नये. हा तिकडे गेला, तो सागर बंगल्यावर बोलला हा वर्षावर बोलला हे महत्त्वाचं नाही, सामान्य माणसं काय बोलतात ते टीव्ही चॅनलवर येत नाही याचं दुःख आहे ते वारंवार आलं पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले. 


मर जायेंगे, कट जायेंगे लेकिन लढेंगे


आम्ही महायुतीत सामील आहे पण साधा फंड ग्रामपंचायत सरपंचाला दिला नाही. इथल्या पालकमंत्र्यांनी कोणत्या समितीवर घेतलं नाही ही कार्यकर्त्याची नाराजी आहे आणि त्या पद्धतीने आता इथून समोर कसं जायचं ते आम्ही ठरवणार आहोत.  अमरावतीमध्ये आमचे दोन आमदार आहेत. आम्हाला स्वाभिमान आहे. आम्ही डुबलो तरी चालेल, पण स्वाभिमान जाता कामा नये. गुलामीत राहण्याची आमची आम्हाला नाही. मर जायेंगे, कट जायेंगे लेकिन लढेंगे.


इतर महत्वाच्या बातम्या