Continues below advertisement

अमरावती : तृतीयपंथीयांचे बळजबरीने धर्मांतरण (Transgenders Conversion) करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये (Amravati) उघडकीस आला. अमरावती जिल्ह्यातील तीन तृतीयपंथीयांचं मुस्लिम धर्मांत धर्मांतरण केलं असून एकूण दहाजणांचं धर्मांतर झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या कार्यालयात तक्रार आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.

अमरावती शहरातील बजरंग टेकडी येथे काही दिवसांपूर्वी तृतीयपंथीयांच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. ती हाणामारी धर्मांतराच्या मुद्द्यावरुन झाल्याचं समोर आलं. त्यानंतर या प्रकरणी भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्याकडे तृतीयपंथीयांनी तक्रार केली.

Continues below advertisement

अमरावतीमध्ये अवैध आणि बळजबरीने धर्मांतरण करण्याचे मोठ रॅकेट सक्रिय असल्याचा दावा भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला. अमरावतील जिल्ह्यामध्ये एक मुस्लिम मौलवी आहे, जो हे सर्व धर्मांतरण करतो असा आरोप अनिल बोंडे यांनी केला.

Amravati Conversion : धर्मांतरणावरुन तृतीयपंथीयांमध्ये वाद

काही दिवसांपूर्वी अमरावतीतील बजरंग टेकडी येथे तृतीयपंथीयांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. एका गटाने दुसऱ्या गटावर मिर्ची पावडर, तलवारी घेऊन हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. तुम्ही हिंदू आहात, मुस्लिम धर्मात धर्मांतरण करा असं म्हणत तृतीयपंथीयांच्या एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला केला.

Amravati Transgenders Conversion : प्रकरण नेमकं काय?

2023 साली काही तृतीयपंथीयांचे धर्मांतरण करण्यात आलं होतं. त्यामध्ये अमरावती किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वरांचाही समावेश होता. ज्या किन्नरांचं धर्मांतरण करण्यात आलं होतं त्यांना त्रास देण्यात आल्याच्या तक्रारी होत्या. त्यानंतर या सगळ्यांचे प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यात पुन्हा हिंदू धर्मांत धर्मांतरण करण्यात आलं. या घटनेनंतर त्यांना मुस्लिम धर्मात परत येण्यासाठी पुन्हा एकदा त्रास द्यायला सुरूवात झाली.

गेल्या महिन्यात अमरावतीमधील किन्नर आखाड्याने या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती आहे. त्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे या गटाशी संबंधित किन्नरांना त्रास देण्यात आला. त्यातूनच काही दिवसांपूर्वी हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे.

या संबंधी बोलताना खासदार अनिल बोंडे म्हणाले की, "अमरावतीमध्ये असे धर्मांतरण करणारी टोळी सक्रिय आहे. तृतीयपंथीयांचे धर्मांतरण करण्यासाठी त्यांना अचलपूरला नेण्यात आले आणि नंतर त्यांना त्रास देण्यात आला. धर्मांतरण झालेल्या तृतीयपंथीयांना पुन्हा एकदा हिंदू धर्मात घेतल्यानंतर त्यांना त्रास द्यायला सुरुवात करण्यात आली. या संबंधी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिणार असून त्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत."

ही बातमी वाचा: