अमरावती (Amravati) : दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा (Police) मृत्यू झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. रविवारी पहाटे दोन वाजता ड्युटी संपवून घरी परतत असताना हा अपघात झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे ही महिला पोलीस कर्मचारी आठ महिन्यांची गर्भवती (Pregnant) होती. या प्रकरणी गाडगे नगर पोलिसांनी आरोपी दुचाकी चालक गौरव मोहोड याला अटक केली आहे. अपघात घडला त्यावेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे. मात्र या घटनेमुळे पोलीस विभागात शोककळा पसरली आहे.
आठ महिन्यांची गर्भवती, ड्युटीवरुन परत येताना अपघात
प्रियंका शिरसाट असं मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. प्रियंका शिरसाट या दहा वर्ष ग्रामीण पोलिसाच्या नियंत्रण कक्षात (Police Control Room) कार्यरत होत्या. प्रियंका शिरसाट या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. शनिवारी रात्री दोनच्या सुमारास त्या ड्युटी संपवून पती सागर रमेश शिरसाट यांच्यासोबत दुचाकीवरुन घरी जाण्यासाठी निघाले होते. गाडगे नगर मंदिरापासून काही अंतरावर पाठीमागून वेगाने येणाऱ्या दुचाकीने पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
पतीवर उपचार सुरु, आरोपी दुचाकी चालक अटकेत
या अपघातात प्रियंका आणि त्यांचे पती रमेश शिरसाट खाली पडले. प्रियांकाच्या डोक्याला आणि शरीराच्या अन्य भागाला गंभीर दुखापत झाला. घटनास्थळीच अतिरक्तस्राव झाला होता. यानंतर पतीने इतर लोकांच्या मदतीने प्रियंका यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवलं. मात्र अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गर्भातील बाळ देखील मरण पावलं. याशिवाय पतीवर उपचार सुरु आहेत. आरोपी दुचाकीस्वार मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे. अपघातानंतर तो तिथूच पडून होता. त्यानंतर गाडगे नगर पोलिसांनी आरोपी दुचाकी चालक गौरव मोहोड याला अटक केली.
वर्षभरापासून नियंत्रण कक्षात कार्यरत
प्रियंका शिरसाट या 2017 मध्ये अमरावती ग्रामीण पोलिसांच्या आस्थापनेवर पोलीस अंमलदार म्हणून रुजू झाल्या होत्या. तर गेल्या वर्षभरापासून त्या ग्रामीण मुख्यालय नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. रविवारी ड्युटी संपल्यानंतर त्या पतीसोबत दुचाकीवरुन घरी जात होत्या. परंतु तेव्हाच काळाने त्यांना गाठलं. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दुसऱ्या दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली, ज्यात त्यांना जबर मार लागल्याने मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा