Amol Kolhe Shivpratap Garudjhep World Television Premiere : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या कारकिदीर्तील लक्षणीय ठरलेली घटना म्हणजे औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून आग्र्याहून केलेली सुटका. अमोल कोल्हेंच्या (Amol Kolhe) शिवप्रताप गरुडझेप (Shivpratap Garudjhep) या सिनेमाच्या माध्यमातून ही ऐतिहासिक घटना पुन्हा एकदा जिवंत करण्यात आली आहे. आता या बहुचर्चित सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.
'शिवप्रताप गरुडझेप'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर कधी होणार?
'शिवप्रताप गरुडझेप' (Shivpratap Garudjhep) या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर (World Television Premiere) येत्या 9 एप्रिलला दुपारी 1 वाजता प्रवाह पिक्चरवर होणार आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाच्या आग्रा भेटीचा थरार प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहायला मिळणार आहे.
वाघ आणि मराठे सहसा कोणाच्या वाटेला जात नाहीत, पण जर कोणी डिवचलं तर फाडल्याशिवाय रहात नाहीत. सिनेमातला हा संवाद अंगावर रोमांचं आणल्याशिवाय रहात नाही. उर अभिमानाने भरुन येईल असे अनेक संवाद या सिनेमाचं बलस्थान आहेत. डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांना या भूमिकेत पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
अमोल कोल्हेंनी शेअर केली 'शिवप्रताप गरुडझेप'ची झलक (Amol Kolhe Shared Shivpratap Garudjhep Video)
अमोल कोल्हे यांनी 'शिवप्रताप गरुडझेप' या सिनेमाची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"पाहा आग्र्याहून सुटकेचा थरार.... 'शिवप्रताप गरुडझेप'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर...जय शिवराय...!!!".
'शिवप्रताप गरुडझेप' या सिनेमाची खासियत म्हणजे या सिनेमाचं शूटिंग लाल किल्यामध्ये पार पडलं आहे. या वास्तूची भव्यता सिनेमा पहाताना प्रेक्षकांना नक्कीच थक्क करेल. महाराष्ट्रापासून दूर उत्तरेत आणि तेही औरंगजेबाच्या अमलाखालील प्रदेशात जाऊन सहीसलामत परत येणं ही अशक्यप्राय वाटणारी कामगिरी छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी फत्ते केली हे 'शिवप्रताप गरुडझेप' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आग्रा मोहिमेचा हा रोमांचकारी इतिहास पाहायला सिनेप्रेमी उत्सुक आहेत.
शिवप्रताप गरुडझेप
कुठे पाहू शकता? प्रवाह पिक्चर
किती वाजता? 9 एप्रिलला दुपारी 1 वाजता
संबंधित बातम्या