Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah) यांचा 15 तारखेला होणारा महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) दौरा रद्द झाला आहे. हा दौरा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते. महाराष्ट्रातील अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघांतील तयारीचा आढावा शाहा यांच्याकडून घेण्यात येणार होता. या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते. मात्र, हा दौरा रद्द करण्यात आलाय. 


कसा होता दौरा? 


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते. या दिवशी त्यांच्याकडून महाराष्ट्रातील अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघांतील तयारीचा आढावा घेण्यात येणार होता. या दौऱ्यात त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते.


प्रमुख पदाधिकाऱ्यांना करणार होते मार्गदर्शन


तिन्ही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना अमित शाह  मार्गदर्शन करणार होते. 15 फेब्रुवारी सर्वात आधी ते अकोल्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करणार होते. अकोल्यातील बैठकीत अमित शहा यांच्याकडून अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ-वाशिम आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार होता.


उत्तर महाराष्ट्रातील पाच मतदारसंघाचा घेणार होते आढावा


अकोला विमानतळापासून ते बैठकीचे ठिकाण असलेल्या बाळापुर रोडवरील तुषार मंगल कार्यालयापर्यंत शहांचा रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. अकोल्यातील बैठकीनंतर अमित शहा हे उत्तर महाराष्ट्रातील पाच मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी जळगाव येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार होते. यानंतर संध्याकाळी त्यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा असणार होता.यात ते मराठवाड्यातील पाच लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार होते. 


उद्धव ठाकरेंपाठोपाठ अमित शाहांचाही होणार होता दौरा 


उद्धव ठाकरेंपाठोपाठ अमित शाहा हे देखील छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार होते. 15 फेब्रुवारीला अमित शाहा संभाजीनगरचा दौरा करणार होते. या दौऱ्यादरम्यान त्यांची जाहीर सभा देखील होणार असल्याची माहिती देण्यात आलेली. संभाजीनगरच्या खडकेश्वर भागातील मराठवाडा संस्कृतीक मंडळाच्या मैदानावर त्यांची सभा पार पडणार होती. विशेष म्हणजे याच मैदानावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरेंच्या सभा गाजल्या होत्या. आता त्याच  मैदानावर अमित शाहा यांची सभा घेणार होते. 


इतर महत्वाच्या बातम्या


Ramesh Chennithala press conference : एवढे भित्रे असू नये, जो सच्चा शिपाई असतो, तो मैदान सोडत नाही, अशोक चव्हाणांवर काँग्रेस नेतृत्त्वाचं टीकास्त्र