Maharashtra Temperature News : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे तर कुठं ढगाळ वातावरण आहे अद्यापही राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा वाढलेलाच आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे आहे. विशेषत विदर्भात तापमान जास्त आहे. अकोला अमरावती, वर्धा या जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 अंशाच्या पुढे गेल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन कारावा लागत आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान
अमरावती - 46वर्धा - 46अकोला - 45.4यवतमाळ - 45.2ब्रह्मपुरी - 45.2नागपुर - 43.8वाशिम - 43.2संभाजीनगर - 41.6मालेगांव - 42.6रत्नागिरी - 34.1नासिक - 38.1सोलापुर - 43.3सतारा - 40.1जालना - 43सांताक्रूज़ - 34.1बारामती - 40.1परभणी - 44कुलाबा - 34.3पुणे - 39.2उदगीर - 39.8नंदूरबार - 41.8सांगली - 40.7धाराशिव - 41.3बीड - 41.8जलगांव - 43अहिल्यानगर - 40.8चंद्रपूर - 43.6
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात उन्हाचा तडाखा वाढला
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा तब्बल 40 अंशांच्या पार पोहोचला आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत असून प्रशासनानेही नागरिकांना उन्हापासून दिलासा देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.काल उल्हासनगरमध्ये 41 अंश, अंबरनाथमध्ये 40 अंश तर बदलापूरमध्ये तब्बल 43 अंश तापमानाची नोंद झाली होती. तर आज उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या तिन्ही शहरांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
नागरिकांनी पुढील 2 ते 3 दिवस विशेष काळजी घेण्याची गरज, हवामान विभागाचा इशारा
अकोला आणि नंदुरबार जिल्ह्याचे तापमान 45.3 अंशाच्या पुढे आहे. सद्या राज्यातील बहुतांश जिल्ह्याचे तापमान 40 च्या पुढे आहे. नागरिकांनी पुढील 2 ते 3 दिवस विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुढील 5 दिवसात पावसाची शक्यता नसल्याने तापमान घटण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसात विदर्भात तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे
वर्ध्यात वाढत्या तापमानाचा फटका आता पर्यटनाला
वर्ध्यात वाढत्या तापमानाचा फटका आता पर्यटनाला बसायला लागला आहे. वर्ध्याचे तापमान 46 अंश सेलसिअस वर आहे. उष्णता वाढत असताना पर्यटक देखील सेवाग्रामच्या बापू कुटीत कमीच पोहचतात. संख्या रोडवली असून येथील पर्यटना वर परिणाम झाला आहे.
महत्वाच्या बातम्या: