अकोला: जिल्ह्यातील बाळापूर परिसरात एका व्यक्तीने आपल्या दोन लहान मुलींना नदीत फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन्ही मुलींचा मृ्त्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलींच्या वडिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळापूर परिसरात दोन अल्पवयीन बहिणींना भीमकुंड नदीपत्रात (Bhimkund River) पुलावरून फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार शनिवारी समोर आला होता. काल रात्री उशिरा दोघींचे मृतदेह शोध व बचाव पथकाच्या हाती लागले. आलिया आणि सदफ असे या दोघी मृत बहिणींचे नाव आहे. मृत मुलींच्या नातेवाईकांनीच म्हणजेच वडिलांनी हे कृत्य केल्याचा संशयदेखील पोलिसांना आहे. त्या आधारावर वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.


बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस ठाण्यात सात आणि पाच वर्षीय अल्पवयीन बहिणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. बुलढाणा पोलिसांकडून (Buldhana News) या दोन्ही मुलींचा शोध सुरु होता. याच दरम्यान पोलिसांना काही माहिती हाती लागली. दोन्ही अल्पवयीन मुलींना नदीत फेकून दिल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात होता. त्यानंतर भीमकुंड नदीत काल सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी नदीपात्रात शोध मोहीम सुरु आहे. शोध व बचाव पथकाच्या मार्फत ही शोधमोहीम सुरू झाली. रात्री उशिरा दोघींचे मृतदेह हाती लागले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. 


दरम्यान, वडिलांनीच मुलींना नदीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान काल बुलढाण्यातील कदमापूर येथे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दोघी बहिणी घरुन निघाल्या होत्या. मात्र, बराच वेळ झाला, मुली घरी परतले नाहीये, अखेर कुटुंबियांनी मुली बेपत्ता असल्याची तक्रार हिवरखेड पोलिसांत दाखल केलेली होती. तपासा दरम्यान वडिलांनी मुलीला पुलावरून नदीत फेकून दिलाचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अधिक तपास बुलढाण्यातील हिवरखेड पोलीस करत आहेत.


आणखी वाचा


पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 


अक्षय शिंदेचं एन्काऊंटर ही चांगली गोष्ट नाही, सरकारने शिक्षा द्यायला हवी; प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, पीडित मुलीचे आई-वडिल पहिल्यांदाच बोलले