अकोला : छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरची जीभ छाटणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस देणार असल्याची वादग्रस्त घोषणा राष्ट्रवादीचे आमदार म्हणून मिटकरी यांनी केली. जोपर्यंत राहुल सोलापूरकर हा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत त्याला शिवप्रेमी माफ करणार नसल्याचं मिटकरी म्हणालेत. अभिनेते राहुल सोलापूरकरांचा जुन्हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी वक्तव्य केल्यानंतर आता पुन्हा वाद निर्माण झाला आहे. 


काय म्हणाले अमोल मिटकरी? 


अमोल मिटकरी म्हणाले की, बहुजन समाजाची अस्मिता असलेल्या महामानवांच्या विरोधात राहुल सोलापूरकरने वक्तव्य केलं. त्याने चर्चेत राहण्यासाठीच हे वक्तव्य केलं, जाणीवपूर्वक बदनामी केली. राहुल सोलापूरकरने वापरलेले अपशब्द हे देशद्रोहापेक्षा कमी नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जननेते पुढाकार घ्यावा आणि प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा. 


राहुल सोलापूरकर जिथे दिसेल त्या ठिकाणी मी त्याचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही असाही इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे. तसेच त्याची जीभ छाटणाऱ्यास एक लाखांचं बक्षीस देण्याची घोषणाही त्यांनी केली. 


राहुल सोलापूरकरांचा माफीनामा


दरम्यान, बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्यानंतर अभिनेता राहुल सोलापूरकरांनी पुन्हा एकदा माफी मागितली आहे. आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्यावर सोलापूरकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 


वेदात सांगितल्याप्रमाणं डॉ.बाबासाहेब आंबेडकरही ब्राह्मणच असल्याचं वक्तव्य राहुल सोलापूरकरांनी केलं होतं. शिवरायांनंतर आता  आंबेडकरांच्या संबंधित केलेल्या वक्तव्यानं राहुल सोलापूरकर चांगलेच अडचणीत आले आहेत.


राहुल सोलापूरकर यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, जिथे दिसतील तिथे त्यांना जोड्याने मारायला हवं असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. 


राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यात असणाऱ्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्य केल्याचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर जाहीर केला. यानंतर खबरदारी म्हणून सोलापूरकर यांच्या कोथरूड येथील निवासस्थानाबाहेर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी लावलेला पोलिस बंदोबस्त आजही कायम असल्याचे पाहायला मिळतोय. 


ही बातमी वाचा :