Amol Mitkari Birthday: राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचा वाढदिवस असल्याने अनेकांनी मिटकरी यांना वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा आणि भेट वस्तू दिल्या. मात्र, यादरम्यान शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या काही युवकांनी अमोल मिटकरी यांना एक आगळी वेगळी भेटवस्तू भेट दिली. याच गोष्टीवरुन सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. गिप्टवरुन आमदार मिटकरींना ट्रोल करीत अनेकांकडून शाब्दिक फटकेबाजीही होते आहे. हे देण्यात आलेलं 'गिफ्ट' ना कुठली वस्तू आहे, ना कुठला फोटो. या युवकांनी आमदार मिटकरींना वाढदिवसानिमित्त थेट 'टरबूज' भेट दिलं आहे आणि मिटकरींनी हे गिफ्ट स्वीकारलं देखील आहे.


टरबूज कापायला आमदार मिटकरींनी दिला नकार


वाढदिवसाला कुठला केक न कापता, हे 'टरबूज' कापण्यात यावं, असा हट्ट या युवकांनी धरला होता. परंतू, सद्यस्थितीत राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी या 'टरबूजा' मुळेच घडताहेत, असा खोचक टोला त्यांनी हसत हसत  लगावला. त्यामुळचं आपण हे टरबूज कापणार नाही. पण आपण आणलेल्या गिफ्टचा मान ठेवत हे टरबूज स्वीकारतोय, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी या युवकांकडून 'टरबूज' स्वीकारले. सध्या या संदर्भात सोशल मीडियावर चांगलीचं चर्चा आणि टोलेबाजी होत आहे. व्यासंगी आणि अभ्यासू प्रबोधनकार, शिवव्याख्याते अशी आमदार अमोल मिटकरी यांची ओळख आहे. जसा राज्यभरात त्यांचा चाहतावर्ग आहे, तसेच ते नेहमी विरोधी ट्रोलर्सच्या निशाण्यावरही असतात.


हनुमान चालिसाच्या मुद्यावरुन झाली होती 'तू तू मै मै'
हनुमान चालिसाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला होता. त्यावेळी भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सभेत हनुमान चालिसेच्या दोन ओळी सांगत राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. मात्र, फडणवीस यांनी हनुमान चालिसाचा अर्थ समजून घ्यावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला होता. फडणवीस यांनी हनुमान चालिसेचा चुकीचा अर्थ सांगितल्याचा