Akola Hatrun ZP Bypoll : अकोल्यातील हातरुण जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांना जोरदार धक्का दिला. या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा 1601 मतांनी दणदणीत विजय झाला. वंचित बहुजन आघाडीच्या लिना शेगावकर यांनी शिवसेनेचे उमेदवार अश्विनी गवई यांचा पराभव केला. हा विजय मिळवून शिवसेनेची जागा हिसकावत जिल्हा परिषदेत वंचितची ताकद वाढली आहे.
जिल्हा परिषदेतील सध्याचं पक्षीय बलाबल एकूण जागा : 53वंचित बहुजन आघाडी : 23शिवसेना : 12भाजप : 05काँग्रेस : 04राष्ट्रवादी : 04प्रहार : 01अपक्ष : 04
हातरुण सर्कलसाठी काल मतदानअकोल्यात जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या हातरुण सर्कलसाठी काल (5 जून) मतदान झालं होतं. या पोटनिवडणुकीत सात उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते तर दोघांनी अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या लिना शेगोकार, भाजपच्या राधिका पाटेकर, शिवसेनेच्या अश्विनी गवई, काँग्रेसच्या रसिका इंगळे यांच्यासह अपक्ष अनिता भटकर या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यात वंचितच्या लिना शेगोकार आणि शिवसेनेच्या अश्विनी गवई यांच्यात मुख्य लढत झाली आणि वंचितचा विजय झाला.
बालेकिल्ल्यात शिवसेनेचा मानहानीकारक पराभवहातरुण सर्कलमध्ये शिवसेनेच्या सुनीता गोरे या निवडून आल्या होत्या. मात्र त्यांना अपात्र घोषित केल्याने येथे पोटनिवडणूक पार पडली. पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले असून काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि भाजप स्वतंत्र निवडणूक लढले. त्यामुळे या पोटनिवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळाली आहे. दरम्यान शिवसेनाचा हां गड असलेला हातरुण जिल्हा परिषद गटावर वंचितने विजय मिळवला. दरम्यान ही निवडणूक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. कारण देशमुख हे बाळापूर मतदारसंघाचे आमदार असून त्यांच्या मतदारसंघातील हातरुण गटासाठी निवडणूक होती. आमदार देशमुख यांची जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती झाल्यावर पहिल्याच निवडणुकीत त्यांना मानहानीजनक पराभवाला सामोरे जावं लागलं आहे.
हातरुणमध्ये पोटनिवडणूक का?हातरुण सर्कलमधून शिवसेनेच्या सुनीता सुरेश गोरे विजयी झाल्या होत्या. मात्र उमेदवारी अर्ज सादर करताना सुनीता गोरे यांनी सोनाळा इथल्या मालमत्तेचा 2014-2019 पर्यंतच कर भरला नाही. मोरगाव भाकरे इथल्या शेतजमिनीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केलेला नाही, असा आरोप करत विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. विभागीय आयुक्तांनी गोरे यांना अपात्र घोषित केलं होतं. त्यामुळे इथे पोटनिवडणूक घेण्यात आली.
मागच्या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक मतं2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत मुख्य लढत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये झाली होती. त्यावेळी शिवसेना उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळाली होती. परंतु यावेळी वंचितने शिवसेनेला धक्का देत दणदणीत विजय साजरा केला. मागच्या वेळी चार प्रमुख पक्षांनी किती मतं मिळाली होती, हे जाणून घेऊया
शिवसेना - 3053वंचित बहुजन आघाडी - 2956भाजप - 2143काँग्रेस - 2116