अकोला : अजित पवारांचा (Ajit Pawar)  पायगुण भाजपाला चांगला लागल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari)  यांनी दिलीये. तीन राज्यात भाजपाला मिळालेल्या विजयावर ते बोलत होतेय. आजच्या पराभवाचं काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी आत्मचिंतन करावं असा टोलाही यावेळी आमदार म्हणून मिटकरी यांनी लगावलाय.. काँग्रेस हावेत राहणारा पक्ष आहेय.‌ ते जोपर्यंत जमिनीवरून काम करणार नाही तोपर्यंत त्यांचे असेच हाल होणार असल्यासही अमोल मिटकरी म्हणाले.


अमोल मिटकरी म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे रात्र आणि दिवस प्रचार करणारे संजय राऊत यांनी देखील आत्मचिंतन केले पाहिजे. आम्हाला विश्वास आहे, भविष्यात महाराष्ट्रात चित्र वेगळे दिसेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पायगुण भारतीय जनता पक्षाला लकी ठरला आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे. आज चार राज्यांमध्ये भाजपची सरशी होताना दिसत आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात देखील आपल्याला भविष्यात महाराष्ट्रात वेगळे वातावरण दिसेल. 


काँग्रेस हा हवेत राहणारा पक्ष : अमोल मिटकरी


काँग्रेस हा हवेत राहणारा पक्ष आहे. जी लोकं हवेत राहतात ती जमिनीवर कधी येत नाही. जोपर्यंत ते जमिनीवर येऊन काम करणार नाही तोपर्यंत जनता त्यांना स्वीकारूच शकत नाही. मग पटोले, वडेट्टीवार यांनी कितीही वेगवगेळ्या राजकीय भूमीका मांडल्या तरी जनता त्यांना स्वीकारणार नाही. जोपर्यंत हवेतील पक्ष जमिनीवर येत नाही तोपर्यंत राजकीय परिवर्तन होणार नाही, असेही मिटकरी  या वेळी म्हणाले. 


शरद पवार जे बोलतात नेहमी त्याच्या उलटे  होते : अमोल मिटकरी


अमोल मिटकरी म्हणाले,  शरद पवार मोठे नेते आहे. त्यांचा संसदीय अभ्यास जास्त आहे. सध्याचे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जनतेचा कल अजित पवारांकडे होता. आगामी काळात जनतेचा कल हा अजित पवारांकडेच असणार आहे. शरद पवार जे बोलतात नेहमी त्याच्या उलटे निकाल येतात. 


देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : अजित पवार


अजित पवार म्हणाले,  मोदींमुळे देशाची प्रतिमा उंचावली आहे.  निकाल चांगला येणार हे मी आधीच बोललो होतो. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. इंडिया, इंडियावाले आता ईव्हीएमबाबत बोलतील. ईव्हीएम घोटाळा हा रडीचा डाव आहे. मोंदींसमोर कोण उमेदवार असणार आहे हे सुद्धा विरोधकांचं ठरलं नाही. जनतेने जो कौल दिला आहे तो मान्य केला पाहिजे. ईव्हीएम घोटाळा एकाला शक्य नाही.