Ajit Pawar मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची कन्या वैभवी देशमुख(Vaibhavi  Deshmukh) हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून 85.33 टक्के गूण मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तिचे अभिनंदन केले आहे. वैभवीनं मिळविलेल्या यशानं तिच्या अंगभूत गुणांचं, हुशारीचं, धैर्याचं, संयमाचं, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडल्याचं सांगून तिच्या यशानं महाराष्ट्राला आनंद झाला आहे, अशा शब्दात त्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

यशातून अंगभूत गुणांचं, हुशारीचं, धैर्याचं, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन-  अजित पवार

वैभवी देशमुख हिला पाठविलेल्या अभिनंदनपर पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, “इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल काल (6 मे 2025) जाहीर झाला. या परीक्षेत विज्ञान शाखेत 85.33 टक्के गूण मिळवून तू उत्तीर्ण झाल्याचे समजून माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला आहे. वडील स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर अत्यंत दु:खद, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात मिळवलेलं यश तूझ्या अंगभूत गुणांचं, हुशारीचं, धैर्याचं, संयमाचं, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडवणारं आहे. तूझ्या यशातून राज्यातील इतर विद्यार्थ्यांना लढण्याची, यशस्वी होण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आहे. असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

तुझ्या कष्टांना, जिद्दीला सलाम- अजित पवार

तूझ्या यशानं वडील स्वर्गीय संतोष देशमुख यांना खुप आनंद झाला असता, ते आज आपल्यासोबत नसले तरी तितकाच आनंद महाराष्ट्र आज अनुभवत आहे. तुझ्या कष्टांना, जिद्दीला सलाम. यापुढेही शैक्षणिक कारकिर्दीत, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तूला असंच यश मिळत राहो, आम्ही सर्व कायमच तूझ्यासोबत आहोत,” असा विश्वास देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी पाठवले वैभवी देशमुखला अभिनंदनाचे पत्र

सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिला फोनवरून शुभेच्छा दिल्या. तसेच फडणवीस यांनी वैभवीला एक शुभेच्छा पर पत्र देखील दिले आहे. रात्री उशिरा अंबाजोगाई चे उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे हे पत्र घेऊन मस्त झोप येते दाखल झाले त्यांनी वैभवी ला हे पत्र दिले.

फडणवीस यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अतिशय कठीण परिस्थितीला तोंड बारावीच्या परीक्षेत अतिशय चांगले यशस्वी संपादन केलेस. मला याची जाणीव आहे की तुझ्या आजच्या या यशाचा तुझे वडील सर्व असे संतोष देशमुख यांना किती आनंद झाला असता पण दुर्दैवाने ते आपल्या नाहीत. पण तुझ्या पाठीवर कौतुकाची ताबा संपूर्ण महाराष्ट्र देतोय.८५.३३ टक्के गुण संपादन करून तू अनेक विद्यार्थ्यांसमोर आदर्श स्थापित केला आहेस तुझे कौतुक करावया जितके कमी आहे. तू अशीच प्रगती करीत राहावी, भविष्यात अनेक यशाचे टप्पे गाठावेत यासाठी आमच्या शुभेच्छा सदैव तुझ्या सोबत आहेतच. तुझ्या या प्रवासात आमची भक्कम साथ आणि पाठिंबा सदैव सोबत असेल.

हे ही वाचा 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI