पुणे: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे आज(17 जून) पिंपरी (Pimpri) चिंचवडमध्ये येत असतानाचं त्यांच्या पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याचे समोर आले आहे. कारण भोसरी विधानसभेसाठी तुतारी फुंकलेले अजित गव्हाणे (Ajit Gavhane) हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी घड्याळ हाती घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. स्वार्थासाठी निघालेल्या गव्हाणेंची आम्ही पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. असा दावा आता शरद पवार गटाने केलाय. गव्हाणेंनी विधानसभेपुर्वी 15 ते 16 माजी नगरसेवक अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत आज घड्याळ हाती घेणारेत. आज शरद पवार पिंपरी चिंचवडमध्ये येणार असताना ही घडामोड घडतेय, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चेला उत आला आहे.
अजित गव्हाणे यांची आपल्या 15 ते 16 माजी नगरसेवक समर्थकांसह घरवापसी
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये धक्क्यावर धक्के दिले होते. आता मात्र अजित पवार यांची परतफेड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. कारण भोसरी विधानसभेसाठी तुतारी फुंकलेले अजित गव्हाणे हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी घड्याळ हाती घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा अजित पवारांच्या (Ajit Pawar) पक्षाचा झेंडा हाती घेत गव्हाणे घरवापसी करणार असल्याचे पुढे आले आहे.गव्हाणे हे त्यांचे 15 ते 16 माजी नगरसेवक समर्थकांसह घड्याळ हाती घेणार आहेत. भोसरी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी गव्हाणेंनी तुतारी हाती घेणार असल्याचं पुढे आले आहे.
शरद पवार गटाच्या आमदारांना सत्ते जवळ यायचे आहे- मंत्री जयकुमार गोरे
शरद पवार गटाच्या बहुतांश आमदारांना सत्तेच्या जवळ यायचे आहे. एखादा अपवाद सोडला तर बहुतांश आमदारांनी त्यांची मने आमच्यापाशी मोकळी केली आहेत, असा गौप्यस्फोट राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. दोन पवार एकत्र येण्याच्या चर्चा जोरात सुरू असताना गोरे यांच्या गौप्यस्फोटातून बऱ्याचशा गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. काल (16 जून) पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे शाळा प्रवेश स्वागतासाठी पोचले असता थोड्या वेळापूर्वी गोरे यांनी हे विधान करून नवीन चर्चेला तोंड फोडले आहे.
शरद पवार गटाचे एक-दोन आमदार सोडले तर सर्वच आमदारांनी सत्तेच्या जवळ जाण्यासाठी इच्छुक आहेत. ते दोन पक्ष कधी एकत्र येणार हे त्यांना माहीत, मात्र याबाबत शरद पवार गटातील अनेक आमदारांनी आमच्याकडे मन मोकळी केली असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार हे अजित पवार गटात विलीनीकरण करण्याच्या तयारीत असल्याच्या हालचालींना एक प्रकारे पुष्टी मिळाली आहे.
दरम्यान, इंद्रायणी नदीवरील झालेल्या पुलाच्या अपघातानंतर सोलापूर जिल्ह्यातील सर्वच जुन्या पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे सुरू असून ज्या पुलाचे ऑडिट पूर्ण झालेले आहे अशा धोकादायक जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद केल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले.
हे ही वाचा