Numerology: हिंदू धर्मात पती-पत्नीच्या नात्याला अत्यंत पवित्र नाते मानले जाते. तसं पाहायला गेलं तर पती-पत्नीमधील नातं खूप सुंदर असते. ते दोन लोकांना तसेच दोन कुटुंबांना एकमेकांशी जोडतात. परंतु हे नातं दीर्घकाळ टिकण्यासाठी दोघांमध्ये काही विशिष्ट गुण असले पाहिजेत. अंकशास्त्रानुार आज आपण अशा जन्मतारखेबद्दल सांगणार आहोत, जी लोक केवळ त्यांची स्वतःची स्वप्नचं पूर्ण करत नाही, तर त्यांच्या जोडीदाराची स्वप्ने देखील पूर्ण करतात. जाणून घेऊया...

Continues below advertisement

पत्नीला प्रेम आणि आदर देणारा नवरा...

अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 असलेले लोक स्वभावाने खूप भावनिक असतात आणि त्यांच्या जोडीदारावर खूप प्रेम करतात. त्यांचा गुण असा आहे की ते त्यांच्या जोडीदाराला पूर्ण आदर देतात आणि त्याच्या प्रत्येक सुखाची काळजी घेतात. अंकशास्त्रानुसार, ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 22 किंवा 20 तारखेला होतो त्यांचा मूलांक 2 असतो.

खूप शांत स्वभावाचे असतात..

अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 चा अधिपती ग्रह चंद्र आहे, म्हणूनच चंद्राचा या लोकांवर विशेष प्रभाव पडतो. हेच कारण आहे की मूलांक 2 असलेले लोक खूप शांत स्वभावाचे असतात आणि त्यांना त्यांच्या सभोवतालची शांती देखील आवडते.

Continues below advertisement

त्यांचे 'हे' गुण त्यांना परिपूर्ण पती बनवतात.

अंकशास्त्रानुसार, ज्या पतींचा मूलांक 2 असतो, ते त्यांच्या जोडीदारांसाठी परिपूर्ण असतात. कारण त्यांच्यात प्रेम, आदर आणि इतरांच्या आनंदाची काळजी घेणे हे सर्व गुण असतात. हे लोक त्यांच्या पत्नींना केवळ आनंदातच नव्हे तर दुःखातही साथ देतात.

जोडीदारांच्या स्वप्नांना पंख देतात....

अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 क्रमांकाचे लोक त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करतात, परंतु या काळात ते त्यांच्या पत्नीच्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करत नाहीत. या क्रमांकाचे पती त्यांच्या पत्नींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीचा आनंद घेण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा देतात. प्रत्येक बाबतीत स्वातंत्र्य देतात..

बिझी लाईफमधून वेळ काढतात...

अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 चे पती स्वभावाने रोमँटिक असतात आणि त्यांचे प्रेम व्यक्त करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. या लोकांचा गुण असा आहे की, ते त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढतात आणि त्यांच्या पत्नींना प्रेम देत राहतात. ज्यामुळे नात्यात नेहमीच नवीनता असते.

हेही वाचा :                          

Grahan Yog 2025: 18 जूनपर्यंत मोठा धक्का बसणार, राहू-चंद्राचा धोकादायक योग, 5 राशींचा कठीण काळ सुरू, पुन्हा दुर्घटना? काळजी घ्या...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)