नवी दिल्ली: भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणखी एक मोठी कारवाई केली आहे, असं वृत्त समोर आलं होतं. मात्र अशा कारवाईचं भारतीय लष्कराने खंडन केलं आहे. मात्र, LOC ओलांडून कोणताही गोळीबार झालेला नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय लष्कराने दिली आहे. सैन्याने केलेल्या या कारवाईत अनेक अतिरेकी ठार झाले आहेत, असंही समोर आलं होतं. मात्र अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याचं लष्कराने स्पष्ट केलं आहे.


जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चार दहशतवादी ठार


गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये चार अतिरेक्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं होतं. या कारवाईबाबत लष्करप्रमुख एम. एम नरवणे यांनी म्हटलं की, हा पाकिस्तानसाठी स्पष्ट संदेश होता. पाकिस्तानमधील जे काही दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून भारतात घुसखोरी करतील, त्यांच्याबरोबर हेच केलं जाईल. ते जिवंत परतणार नाहीत.  सफरचंदांनी भरलेल्या ट्रकमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरूद्ध मोहिम राबविणाऱ्या सैनिकांची लष्करप्रमुखांनी प्रशंसा केली. सुरक्षा दलाच्या वतीने ही एक यशस्वी कारवाई होती. सर्व सुरक्षा दलांमध्ये हे चांगले समन्वय दर्शवत आहे. ठार झालेले चारही दहशतवादी हे जैश-ए-मोहम्मदचे असण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलं.