श्रीरामपूर : चोरीच्या संशयावरून तरुणाला झाडाला बांधून अमानुष मारहाण (Young Boys Beaten) केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमधील (Ahmednagar News) श्रीरामपूरमध्ये घडली आहे. शेळी चोरी केल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चार तरुणाला झाडाला उलटे बांधून अमानुष मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीच्या संशयावरून अशा पद्धतीने मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रात कायदा आहे की नाही? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
चोरीच्या संशयावरून तरूणाला अमानुष मारहाण
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील नाना गलांडे यांची काही दिवसापूर्वी शेळी आणी काही कबुतर चोरीला गेले होते. या चोरीच्या संशयावरून शुक्रवारी सकाळी चार तरुणाला त्यांच्या घरातून बाहेर फरफटत आणून त्यांचे कपडे काढून, त्यांना झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ चोरी केल्याच्या संशयावरून अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा अधिकार यांना दिला कोणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जखमी तरुणाला श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात आहे.
तरुणांच्या आईलाही धक्काबुक्की केल्याचा आरोप
या मारहाण प्रकरणी मारहाण करणारे युवराज गलांडे, नानासाहेब गलांडे, राजू बोरगे, राजेंद्र पारखे, मनोज बोडखे आणि दुर्गेश वैद्य यांनी अतिशय निर्दयपणे या दलित तरुणाला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. तरूणाची आई जेव्हा त्यांना सोडवायली गेली, तेव्हा तिलाही धक्काबुक्की करून काढून देण्यात आलं, असा आरोप जखमी तरुणाच्या आईने केला आहे. तर, आम्ही दलित असल्याने मारहाण केल्याचा आरोप जखमी तरूणाने केला आहे.
आरोपींवर कारवाईची मागणी, उद्या रास्ता रोको आंदोलन
या धक्कादायक घटनेमुळे दलित समाज आक्रमक झाला असून अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी दवाखान्यात जात माहिती घेतली आहे. लवकरात लवकर आरोपींना जेरबंद करण्याची मागणी होत असून कारवाईच्या मागणीसाठी उद्या रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :