शिर्डी: शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. साई मंदिर भीषण पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तिने मेलद्वारे धमकी दिल्याची माहीती समोर आली आहे. काल (शुक्रवारी) सकाळी धमकीचा मेल आला आहे. साईबाबा संस्थानसह शिर्डी पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यापूर्वी देखील साई संस्थानला धमकीचे मेल आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यापुर्वीचे पत्र/आलेले मेल फेक निघाले होते. पहलगाम घटनेमुळे वातावरण ढवळून निघाले असताना साई संस्थानला पुन्हा धमकीचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे मेल खोडसाळपणा की आणखी काही? याबाबतचा तपास सुरू आहे. 

साई संस्थानसह पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवरती आल्या आहेत. साईबाबा संस्थांनचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्या तक्रारीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. साई मंदिर भीषण पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तिने मेलद्वारे धमकी दिल्याची माहीती समोर आली आहे. आधी देखील देखील साई संस्थानला धमकीचे मेल आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अज्ञात व्यक्तिने मेलद्वारे धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.