Ramdas Athawale On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यासोबत यावे, मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो. आपण दोघे मिळून भाजपसोबत राहूया, उद्धव ठाकरेंकडे तुम्हाला काही मिळणार नाही," असे आवाहन रिपाइंचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना केलं आहे. शिर्डी (Shirdi) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आठवले यांनी हे अवाहन केलं आहे,


प्रकाश आंबेडकर आमचे नेते आहेत, मात्र रिपाइं ज्यांच्या बाजूने असते त्यांनाच सत्ता मिळते. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावे मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो. आपण दोघे मिळून भाजप आणि नरेंद्र मोदींसोबत राहू. तर उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये, ते कसे आहेत मला माहित आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर भाजपसोबत आले तर त्यांचे स्वागतच असल्याचे रामदास आठवले म्हणाले. त्याचबरोर 'महाविकास आघाडी दाखवतेय वज्रमुठ आणि रोज करतेय सगळ्यांची लूट' असा आपल्या खास शैलीत आठवले यांनी मविआचा समाचार घेतला.


कार्यकर्त्यांना आठवलेंचे खडेबोल


अधिवेशनादरम्यान बेशिस्त कार्यकर्त्यांना रामदास आठवले यांनी चांगलेच खडेबोल सुनावले. रिपब्लिकन पक्षाचा बाजार करु नका. इतर पक्षांमध्ये तुम्ही अशा पद्धतीची वर्तणूक पाहिली का? नुसते फोटो काढून, स्टेजवर गर्दी आणि घोषणाबाजी करुन पक्ष वाढणार नाही. बेशिस्तपणामुळे पार्टीचा सत्यानाश झाला असून हे थांबले नाही तर अशा लोकांना पक्षातून काढून टाकीन, अशा शब्दात आठवले यांनी कार्यकर्त्यांच्या बेशिस्तपणाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली.


आठवलेंची चिता करायला आम्ही समर्थ : राधाकृष्ण विखे पाटील 


मध्यंतरी अनेक पक्ष वेगवेगळ्या कारणांनी एनडीएमधून बाहेर पडले. मात्र दुसऱ्या बाजूला रामदास आठवले ठामपणे भाजपसोबत उभे राहिले. "सत्तेच्या स्पर्धेत किती आले आणि किती गेले.. भाजपसोबत राहिले फक्त रामदास आठवले, शिवशक्ती-भिमशक्ती याची ताकत साऱ्यांना दाखवू आणि 2024 ला मविआचा पूर्ण सफाया करु" रामदास आठवले अनेक वर्ष केंद्रात मंत्री आहेत. मात्र अद्याप त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. कार्यकर्त्यांनी आठवले साहेबांची चिंता करु नये, ती चिंता करायला आम्ही समर्थ आहोत असे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले. 


VIDEO : Ramdas Athawale on Shirdi Loksabha : संधी मिळाल्यास पुन्हा शिर्डीतून लोकसभा लढणार