अहिल्यानगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांनी (Ajit Pawar) समजावून, नोटीस पाठवूनही संग्राम जगतापांवर (Sangram Jagtap) काहीच परिणाम झाल्याचं दिसत नाही. पक्षाच्या नोटिशीनंतरही त्यांचे मुस्लिम विरोधात वक्तव्यं सुरूच आहे. आताही अहिल्यानगरमध्ये त्यांनी तशाच पद्धतीचं वक्तव्य केलं. आता आपल्याला हा देश, धर्म सुरक्षित ठेवायचा आहे, त्यामुळे आपले पण दोन-चार लोक आत गेले तरी हरकत नाही, पण लोकांना आता प्रत्युत्तर द्या असं जाहीर आवाहन त्यांनी केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिमांकडून कोणतीही खरेदी करू नका अस वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी त्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना नोटीसही पाठवली. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अहिल्यानगर इथल्या शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश मोर्चामध्ये त्यांनी मुस्लिम समूदायाच्या विरोधात पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं.
अहिल्यानगरमध्ये काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात आक्षेपार्ह पत्रक भिरकवल्याच्या निषधार्थ मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सामील झाले.
Sangram Jagtap Speech : त्यांना इथे सिरीया कायदा हवा का?
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, "अहिल्यानगरमध्ये नवरात्रोत्सव काळात णीवपूर्वक काही फलक लावण्यात आले. या फलकांच्या माध्यमातून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर गोमांस टाकण्यात आले होते. त्यावेळी आमची मागणी होती की आरोपी अटक करावी.
आपल्याला आश्वासन मिळाल्यानंतर आपण लगेच रस्ता रोको मागे घेतला. पण त्यानंतर एक घटना घडली आणि मुस्लिम रस्त्यावर जाऊन बसले.
पण पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असताना ते रस्त्यावरून उठायला तयार नव्हते. मग त्यांना काय इथे सिरीया कायदा हवा आहे का? त्यांना वाटलं आपली गर्दी पाहून पोलीस घाबरतील. मात्र पोलीस प्रशासनाने त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले."
काही दिवसांपूर्वी एमआयएमचे बोकड आपल्या अहिल्यानगरमध्ये आले होते. हे बोकड आले आणि बडबड करून करून गेले. अहिल्यानगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला मग त्यांनी याचा निषेध केला का? असा प्रश्न आमदार संग्राम जगताप यांनी विचारला.
Sangram Jagtap Controversial Statement : मुस्लिमांनीच पत्रकं वाटली
संग्राम जगताप म्हणाले की, "हे लोक अजिबात संविधान मानत नाहीत. दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी एका मुस्लिम युवकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पत्रक भिरकावले. पण पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतलं. ईद वेळी एक पत्रक हे लोक वाटतात. ज्यावर लिहिलंय की ईदची खरेदी आपल्याकडून करा, आपले लोक जकात काढतील तर बाकीचे लोक हत्यार काढतील असा उल्लेख आहे. आपल्याच लोकांकडून खरेदी करा हे सांगायची सुरुवात त्यांनीच केली."
Sangram Jagtap Ahilyanagar : राष्ट्रगितावेळी हे बसून राहतात
संग्राम जगताप म्हणाले की, "भारताची क्रिकेट टीम कोणत्याही टीम कडून सामना हरला की ही पिलावळ फटाके वाजवतात. ही कोणती काल्पनिक गोष्ट नाही, याबाबत पोलीस तक्रार झाली आहे. मागे जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी या लोकांनी दिखाऊ पद्धतीने मदत केली. मनपात जेव्हा सर्वसाधारण सभा होते त्यावेळी राष्ट्रगीत सुरू झाले की, हे लोक उठून जातात. जे लोक सभागृहात असतात ते उठून उभा राहात नाहीत तर मोबाईलवर बघत खालीच बसून राहतात. त्यामुळे राष्ट्रगीत म्हणणारे आणि राष्ट्रगीत सुरू झाल्यावर उभा राहणारे लोक सभागृहात आले पाहिजे."
ही बातमी वाचा: