अहमदनगर : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या पुढाकाराने नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील राशीन येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) असल्याने तरुणांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमात रोहित पवारांनी रोहित शर्माला पाच प्रश्न विचारली. रोहित शर्माने या प्रश्नांची धडाकेबाज उत्तरे दिली आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोहित पवार म्हणाले की, कसे आहात कर्जत जामखेडकर. आपल्या सर्वांचे लाडके हिटमॅन इथे आलेले आहेत. आपल्या सर्वांसाठी त्यांनी आणि आपल्या टीमने वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. त्यामुळे रोहित शर्मा यांच्या आवाजाचा जयघोष मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. असे म्हणताच उपस्थित तरुणांनी रोहित...रोहित...रोहित....रोहित... असा एकच जल्लोष केला. यानंतर रोहित पवार यांनी रोहित शर्माला पाच प्रश्न विचारले.
रोहित शर्माची 5 धडाकेबाज उत्तरं
1) आमच्या ग्रामीण भागात कर्जत जामखेडमध्ये आल्यानंतर आणि राशीनच्या या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसा वाटत आहे? असे विचारले असता रोहित शर्मा म्हणाला की, मला पवित्र वाटतंय. आपण जेव्हा गाडीत येत होतो तेव्हा मला वाटत होते की इथे किती शांतता आहे. या क्रिकेट अकॅडमीच्या निमित्ताने मला इकडे यायला मिळाले. त्यामुळे मला भरपूर आनंद झालाय. मी परत इकडे येण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार, असे त्याने म्हटले.
2) कर्जतचे महाराष्ट्रात वजन महाराष्ट्रात वाढलेले आहे. पण, इथे असलेल्या आमच्या नागरिकांचा आवाज तुम्हाला कसा वाटला? असे विचारले असता रोहित शर्मा म्हणाला की, स्टेडियमपेक्षा मोठा येथे आवाज वाटतोय, असे उत्तर त्याने दिले.
3) तुम्ही क्रीक किंगडम अकॅडमी ग्रामीण भागात सुरू करत आहात. कर्जत जामखेडमध्ये, राशीनमध्ये सुरू करत आहात. त्यामुळे या भागातून उद्याचे रोहित शर्मा आपल्याला देशासाठी मिळतील, असं तुम्हाला वाटतं का, असं विचारले असता, मला पूर्ण आत्मविश्वास आहे. मी बघतोय की इकडे सगळ्यांमध्ये क्रिकेटची खुप आवड आहे. मला यात कुठलीही शंका नाही की, इथून पुढचे जसप्रीत बुमराह, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल मोहम्मद सिराज सगळे इकडूनच येणार, असे रोहित शर्माने म्हटले.
4) राशीनला आपण एक स्टेडियम सुरू करत आहोत. कर्जतला आणि जामखेडलाही आपण स्टेडियम सुरू करणार आहोत. त्यामुळे कर्जत आणि जामखेडकरांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की, पुढचे स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आम्ही जेव्हा सुरू करू तेव्हा तुम्ही भूमिपूजनासाठी तिथे यावं असे म्हटले असता रोहित शर्मा म्हणाला की, मी इथे नक्कीच येणार येणार आहे.
5) रोहित भाऊ तुम्हाला विनंती करतो की, आम्हाला अजून एक वर्ल्ड पाहिजे. आणि वर्ल्ड कप घेत असताना आम्हाला कॅप्टन म्हणून कोणाला बघायचंय असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थितांना विचारला. यावेळी उपस्थितांमधून रोहित...रोहित...रोहित... असा जयघोष पहायला मिळाला. यावेळी शर्माने तरुणांचे आभार मानले.
आणखी वाचा