Ahmednagar News अहमदनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी त्यांचे पुतणे कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मोठा धक्का दिला आहे. रोहित पवारांच्या कट्टर समर्थकाने त्यांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Ajit Pawar) पक्षात प्रवेश केला आहे. 


आमदार रोहित पवार हे सध्या लोकसभेच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या प्रचारार्थ रोहित पवार सभा घेत आहेत. अशातच आता रोहित पवार यांना कर्जत जामखेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. रोहित पवारांचे कट्टर समर्थक अक्षय शिंदे (Akshay Shinde) यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. 


अक्षय शिंदे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज 


अक्षय शिंदे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहेत. मुंबईमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत अक्षय शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे. अक्षय शिंदे हे सुरुवातीपासूनच रोहित पवार यांच्यासोबत सक्रिय राजकारणात कार्यरत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार आणि अक्षय शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे दिसून येत होते. आता त्यांनी अजित पवारांच्या पक्षाची वाट निवडली आहे. 


रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. रोहित पवार म्हणाले की, तिकडे मलिदा गँग आहे अन् इकडे जनता आहे. त्यामुळे जनता विरुद्ध नेता अशी लढत होणार आहे. साडेतीन लाख ते चार लाखांच्या मताधिक्याने सुप्रिया सुळे निवडून येणार आहेत. पक्ष चोरीला गेला,  चिन्ह चोरीला गेले. लोकसभेच्या सहा महिन्यांआधी सर्व यंत्रणा चोरीला गेली. ती सगळी यंत्रणा अजितदादा स्वतःसाठी वापरत आहेत. ज्या मैदानावर गेली 40 वर्ष सभा होते ते मैदानही चोरीला गेलेले आहे. आता सगळेच चोरीला जात असले तरी लोकांचा विचार चोरीला जाऊ शकत नाही. तोच विचार आणि तीच ताकद आणि विजय हा तुतारीचा झाल्याशिवाय राहणार नाही", असे टीका त्यांनी केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Supriya Sule : जास्त दिवस सहन करणार नाही, उद्रेक होऊ देऊ नका; आई अन् नणंदेवर टीका केल्याने सुप्रिया सुळे संतापल्या


Rohit Pawar On Ajit Pawar : आईच्या योग्यतेवर अजितदादांचं भाष्य, रोहित पवारांचं जशास तसं उत्तर