Rohit Pawar on Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण (Maratha Reservation) देणार कायदा विधीमंडळात पास करण्यात आलाय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज (दि.20) मंजूर करण्यात आलेल्या विधेयकाबाबत सवाल केले आहेत. ते कर्जत येथे बोलत होते.
'भाजप मराठा आरक्षणाची टक्केवारी कमी करत'
राज्यात मराठा लोकसंख्या 28 टक्के असताना सरकारने 10 टक्के आरक्षण (Maratha Reservation) कसे दिले, असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं गेलं. त्यानंतर भाजप सरकारकडून 13 टक्के आरक्षण दिलं गेलं आणि आता दहा टक्के आरक्षण दिलं गेलं आहे. म्हणजेच भाजप मराठा आरक्षणाची टक्केवारी कमी करत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदींकडे मराठा आरक्षणवर बोलण्याचे धाडस नाही
रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले, ओबीसी मधून आरक्षण द्यायचं की नाही हा सरकारचा प्रश्न आहे. मात्र जे पण आरक्षण दिलं जात आहे हे टिकलं पाहिजे ही गोष्ट महत्त्वाची आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोलून मराठा समाजाला दोन महिन्यापूर्वीच आरक्षण दिलं गेलं असतं. यासोबतच धनगर समाजाला, लिंगायत समाजाला आणि मुस्लिम समाजाला देखील आरक्षण दिले गेले पाहिजे. पंतप्रधान मोदी राज्यात येतात मात्र या नेत्यांमध्ये त्यांच्याशी या विषयावर बोलण्याचं धाडस नसल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
जरांगे-पाटीलांकडूनही आक्षेप
करोडो मराठ्यांची मागणी आहे ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण हवं आहे. जे आरक्षण आम्हाला हवं आहे ते आम्ही मिळवणारच आहोत. सरकारने दिलेल्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ते न्यायालयात टिकेल का? हा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्या हक्काचं ओबीसीमधील आरक्षण (OBC Reservation) आम्हाला हवे आहे. आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या. याला आमचा सक्त विरोध आहे. सध्या कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात येत आहेत. यात बोगस प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहेत. असे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केलंय.
इतर महत्वाच्या बातम्या
'मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलंय, आता त्यांनी दुसऱ्यांच्या आरक्षणात येऊ नये'; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल