Continues below advertisement

अहिल्यानगर : आगामी निवडणुकीत मूळ ओबीसींनाच (OBC) उमेदवारी देऊ असे निर्देश शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या बैठकीत देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यावरून आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शरद पवारांवर टीका केली. इतके वर्षे मराठ्यांचे नेते म्हणून मिरवणारे शरद पवार आता मराठा समाजावर अन्याय करत असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचं पाप त्यांनी केलं असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी जागेवर मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांनाच संधी द्या असे निर्देश शरद पवारांनी त्यांच्या नेत्यांना दिले आहेत. याच मुद्द्यावरून विखेंनी पवारांवर टीका केली.

Continues below advertisement

Radhakrishna Vikhe On Sharad Pawar : पवारांनी आरक्षण नाकारण्याचं पाप केलं

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचा पाप शरद पवार साहेबांचंचं आहे. 1994 साली मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर राज्यामध्ये ओबीसी आरक्षण लागू केलं. त्यामध्ये जर मराठा समाजाला सामावून घेतलं असतं तर आता वाढणारी जातीयवादाची दरी निर्माण झाली नसती.

Radhakrishna Vikhe On Maratha Reservation : निर्णय मराठा समाजाने घ्यावा

मात्र त्यांनी आयुष्यभर समाजा-समाजात भांडण लावण्याचे काम केलं. इतके वर्ष मराठ्यांचे नेता म्हणून ते मिरवत होते आणि आज त्याचं समाजावर अन्याय करण्याची भूमिका घेत आहेत. आता त्याच्याबद्दल काय भूमिका घ्यायची तो निर्णय मराठा समाजाने घ्यायचा आहे अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

Sharad Pawar On OBC Candidates : काय म्हणाले होते शरद पवार?

दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी त्यांच्या पक्षाची बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांनांच संधी द्या अशा सूचना शरद पवारांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पदाधिकारी, आमदार, खासदारांना दिल्या होत्या.

ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही, केवळ त्याच ठिकाणी पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी द्या असे निर्देश शरद पवारांनी दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा पहिला पक्ष आहे ज्याने अशी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे.

ही बातमी वाचा: