Nitesh Rane : राज्यात हिंदुत्ववादी कोण यावरून भाजप (BJP), शिंदे गट आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. यापुढे जात आता भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट असा केला आहे. श्रीरामपूर येथे जन आक्रोश मोर्चाच्या (Jan Akrosh Morcha) निमित्ताने नितेश राणे आले असताना त्यांनी भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंदूहृदयसम्राट असा उल्लेख केल्याने यावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
अहमदनगरच्या (Ahmadnagar) श्रीरामपूरमध्ये भाजपच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. लव्ह जिहाद आणि आदिवासी तरुणाच्या अपहरणाच्या घटनेचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या निमित्ताने नितेश राणे यांनी हजेरी लावली असून यावेळी ते बोलत होते. या मोर्चामध्ये माजी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके हेसुद्धा सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी जन आक्रोश आंदोलनात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा केला आहे. यामुळे दोन दिवसापासून सुरु असलेल्या भाजप शिवसेना पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हिंदूह्रदयसम्राट म्हणून ओळख आहे. त्यानंतर राज ठाकरेंना हिंदुह्रदयसम्राट अशी उपमा कार्यकर्त्यांनी दिली खरी, पण नंतर ती हिंदूजननायक अशी बदलण्यात आली. आता नितेश राणे यांनी अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये जनआक्रोश मोर्चात फडणवीस यांचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट असा केला आहे. त्यामुळे यावरून र्जकीय चर्चांना उधान आले आहे. हिंदूहृदयसम्राट म्हटल्यावर शिवसेनचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आपसूक डोळ्यासमोर येत. त्यानंतर राज ठाकरेंना देखील कार्यकर्त्यांनी ही हिंदूहृदयसम्राट उपमा देण्यात आली होती. मात्र कालातंराने बदलविण्यात आली. मात्र आता नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंदूहृदयसम्राट असा उल्लेख केल्याने शिवसेना यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
यावेळी नितेश राणे म्हणाले कि, सत्तेत असंन अथवा नसणे एवढा छोटा विषय करू नका..हा विषय गंभीरपणे घ्यायला हवा. जी परिस्थिती आज उद्भवली आहे. तसेच धर्मांतरच्या ऍक्टिव्हिटी आज महाराष्ट्रमध्ये वाढत आहे. हिंदू मुलांचं भविष्य खराब करणारे आहेत, त्या विरुद्ध हा एल्गार असून आमचं सरकार आहे, म्हणून आम्हाला विश्वास आहे..पीडित मुलींनी हिंदू संघटनांना संपर्क केला पाहिजे. लग्नाची आमिषे दाखवून मुलींना विकल जातंय..मुस्लिम मुलीशी लग्न करणारा युवक आज गायब असून पोलिसांनी तात्काळ तपास लावावा. त्याचबरोबर धर्मांतर विरोधी कायदा राज्यात आणला पाहिजे, ही भावना असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नितेश राणे म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
अमरावती मधल्या घटनांचे पडसाद आता श्रीरामपूर मध्येही उमटतांना दिसत आहे. 31 ऑगस्ट रोजी पकडे नावाचा जो तरुण असून त्याने मुस्लिम मुलीशी लग्न केल्यानंतर त्याचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच संदर्भात श्रीरामपूरमध्ये जन आक्रोशमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला हिंदुत्ववादी संघटनासह आदिवासी संघटना असतील या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत. आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळ अधिवेशनात देखील हा प्रश्न उपस्थित केला होता