अहमदनगर : येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा (Maharashtra Assembly Election 2024) बिगूल वाजणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या माध्यमातून येत्या निवडणुकांच्या अनुषंगाने जय्यत तयारी सुरू आहे. अहमदनगर (Ahmednagar News) जिल्ह्यातही असंच वातावरण पाहायला मिळत असून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात (Shrigonda Assembly Constituency) राजकीय नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. 


या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेकजण इच्छुक आहेत. याच दरम्यान श्रीगोंदा कुकडी सहकारी साखर कारखाना चेअरमन माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांनी आज माळेगावमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज शरद सभागृह येथे शेकडो कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. 


अण्णासाहेब शेलार निवडणुकीसाठी इच्छुक 


तर दुसरीकडे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार हे देखील काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना भेटले होते. अण्णासाहेब शेलार देखील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. अण्णासाहेब शेलार हे पूर्वीचे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आहेत.  


कुणाला मिळणार तिकीट? 


जरी राहुल जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली तरी अण्णासाहेब शेलार हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. आम्ही पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेत आहोत, मात्र जनतेने आम्हाला तिकीट दिलं आहे. त्यामुळे या निवडणुकीतून माघार घेणार नाही, यापूर्वी दोनदा इतरांसाठी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. मात्र यंदा जनतेचा आग्रह असल्याने आम्ही निवडणूक लढवणारच आहोत, अशी ठाम भूमिका अण्णासाहेब शेलार यांनी घेतली आहे. आता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार नेमकं कोणाला तिकीट देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


अशी झाली होती 2019 ची निवडणुकीत


दरम्यान, 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अटीतटीची लढत झाल्याचं श्रीगोंदा तालुक्यात दिसलं (Maharashtra Politics) होतं. भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते 1,03,258 मतांनी विजयी झाले होते. तर राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम प्रतापराव शेलार यांना 4,750 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 


आणखी वाचा 


राहुरीतून भाजपच्या माजी मंत्र्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, 2019 चा वचपा काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात, विद्यमान आमदारांना धक्का?


Maharashtra Assembly Election 2024 : अहमदनगरच्या शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात इच्छुकांची रांग, आता 'या' मातब्बर महिला नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!