Radhakrishna Vikhe Patil : आगामी काळात खासगी तत्त्वावर पशुवैद्यकीय महाविद्यालये (Veterinary Colleges) सुरू करण्याचा विचार असल्याचे मत राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Ncp Leader Eknath Khadse) यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मूळ पशुवैद्यकीय विद्यापीठांच्या नियमात बदल करुन विनाअनुदानित तत्वावर पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देण्याचा विचार असल्याचे विखे पाटील म्हणाले.


काय म्हणाले होते एकनाथ खडसे?


राज्यात मागच्या 50 वर्षात एकही पशुवैद्यकीय महाविद्यालय नव्याने सुरु झालं नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  एकनाथ खडसे यांनी केलं होते. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, खडसे साहेबही मागील काळात मंत्री होते त्यांचीही काही जबाबदारी होती. पण ठीक आहे, आगामी काळात खासगी तत्त्वावर पशुवैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा विचार असल्याचे विखे पाटील म्हणाले. राज्यात यापूर्वी कृषी विद्यापीठ, कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत येणारी ठराविक महाविद्यालये होती. मात्र, कृषी विद्यापीठ कायद्यांमध्ये बदल केल्यानंतर खासगी तत्त्वावर राज्यात कृषी महाविद्यालय सुरू झाली. त्याच धर्तीवर राज्यातील पशुसंवर्धनांमधील कायद्यामध्ये बदल केला जाणार आहे. त्यानंतर खासगी तत्वावर पशुसंवर्धन महाविद्यालयांना कोणी परवानगी मागितली तर ती देण्याचा विचार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. 


संजय राऊतांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे


शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांना किती महत्व देणार. ते नेहमीच बेताल वक्तव्य करत राहतात. त्यांच्याकडे आता दुर्लक्ष केलं पाहिजे असे म्हणत विखे पाटील यांनी राऊतांवर टीका केली. राज्यपुढे नवीन नवीन विषय आहेत त्याला प्रसिद्धी देण्याची गरज असल्याचे विखे पाटील म्हणाले. दरम्यान, आम्ही मुख्यमंत्र्यांबाबतचे पुरावे केंद्र शासनाकडे पाठवले असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलं होते. यावर बोलताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राऊतांवर टीका केली. तसेच या सरकारनं 40 आमदारांचीही एसआयटी चौकशी लावायला पाहिजे असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, मधल्या काळात संजय राऊत हवा पालट करून आले आहेत. त्यावेळी त्यांनी बऱ्यापैकी चिंतन केलेलं दिसत आहे. मात्र भविष्या वक्तव्य करताना संजय राऊतांनी विचार कराय़ला हवा असेही विखे पाटील म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


गिरीश महाजनांच्या वक्तव्याचा भाजपच्या खासदार रक्षा खडसेंना मोठा धक्का! एकनाथ खडसे म्हणाले, पातळी घसरली...